Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

साताऱ्यातील कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क , हात धुणे , अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करू या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

साताऱ्यातील कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क , हात धुणे , अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करू या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 सातारा जिल्ह्यासाठी 45.59 कोटी एवढा निधी दिल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

                  प्रतिक मिसाळ सातारा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानी उभं असलेल्या संग्रहालयाचं रूपांतर कोविड हॉस्पिटल मध्ये करून त्यांच्या विचारांनाच अभिप्रेत असलेले कार्य आपण करत आहोत हे निश्चितच अभिमानास्पद आहे . या ठिकाणी उत्तम सुविधा आहेत . त्याचा वापर करून कोविड बाधितांना उत्तम आरोग्य देण्यासाठी प्रयत्नात राहा . इथून पुढे लस कधी का येईना आपण कोविड प्रादुर्भाव रोखणाऱ्या मास्क , हातधुणे आणि अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्याला या प्रादुर्भावापासून दूर ठेवू या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले . आज सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारलेल्या कोविड हॉस्पिटलच्या ऑनलाईन उदघाटन प्रसंगी ते बोलत होते . यावेळी ऑनलाईन पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर , आरोग्यमंत्री राजेश टोपे ( ऑनलाईन ) , सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील , गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले , खा . श्रीनिवास पाटील आ . छत्रपती शिवेंद्रराजे भोसले , आ जयकुमार गोरे आ मकरंद पाटील , आ . दिपक चव्हाण , आ महेश शिंदे , जिल्हाधिकारी शेखर सिंह , जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा , जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल , जिल्हा परिषदेचे पदाधिकारी , कोविड हॉस्पिटल उभारणीत मदत करणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते . अवघ्या 20 दिवसात अतिशय चांगल्या सुविधा असलेले कोविड हॉस्पिटल उभं केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक करून जगभरातील देशात लाट ओसरली ओसरली म्हणता म्हणता दुसरी कोरोना प्रादुर्भावाची लाट आल्याचे उदाहरण असल्यामुळे आपल्याला अधिक सजग राहून काम करावं लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले . माझं कुटुंबं माझी जबाबदारी ही मोहिम आपण लोकांना या प्रादुर्भावा पासून दूर ठेवण्यासाठी राबवत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले . छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानी उभं असलेल्या संग्रहालयात रयतेच्या आरोग्य सेवेसाठी काम होणार असल्याचे सांगून खरं तर इथे कोणाला यायची वेळच येऊ नये अशा सदिच्छा देतो , जिल्ह्यात एक सुसज्ज कोविड हॉस्पिटल असावं अशी सर्वांचीच इच्छा होती त्या इच्छेची पूर्ती होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले . यावेळी जंबो कोविड हॉस्पिटल उभं केल्यानंतर जबाबदारीही तेवढीच मोठी असल्याची जाणीव जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला त्यांनी यावेळी करून दिली . लोकप्रतिनिधी , प्रशासन या कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अविरत प्रयत्न करीत असल्याचा नामोल्लेख करून खाजगी हॉस्पिटलच्या एक लाखाच्या पुढच्या बिलाचे ऑडिट करावे , त्यावर लक्ष ठेवून राहा अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या पुणे विभागाला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करायच्या उपाययोजनेसाठी 151 कोटी दिले असून पाच जिल्ह्यापैकी सातारा जिल्ह्याला 45.59 कोटी रुपये दिल्याची घोषणाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली विविध साथीच्या रोगाबरोबर आपण राहिला शिकलो तशीच काळजी घेऊन कोरोना बरोबर राहू या , लस येईल तेंव्हा येईल आपण हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पाळून यावर विजय मिळवू असा आशावाद विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्ती केला हॉस्पिटल सुरु होईल , सर्व साधनांची पूर्ततापण होईल पण डॉक्टर आणि नर्सेस यांची सेवा अधिक गतीने होण्याची गरज असून मृत्यू दर कमी करण्याबरोबर अधिकाधिक ट्रेसिंग करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले . कृष्णा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटल मध्ये अजून ऑक्सिजनचे बेड वाढू शकतात , त्यासंस्थेला सांगून ती क्षमता जिल्ह्यासाठी महत्वाची ठरेल असेही टोपे यांनी यावेळी सांगितले . सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कोविड हॉस्पिटल उभं करण्यासाठी शासनाने अतिशय तत्परतेनी मदत केल्याचे सांगून गेल्या पाच महिन्यातील अनुभव लक्षात घेऊन हे हॉस्पिटल उभे केले . इथे डायलेसिसच्या व्यवस्थेचे चार बेडही उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड हॉस्पिटल उभं करण्यासाठी तत्परतेनी परवानगी दिली . जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमने अतिशय कमी काळात सुसज्ज असं हॉस्पिटल उभं केल्याचे सांगून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाच्या कामाचे केले . 


जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या कोविड हॉस्पिटल उभारणी , त्यात कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत . यासाठी लागलेला निधी याची सविस्तर माहिती दिली . या नंतर कोविड हॉस्पिटलवर बनवलेली चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली . यावेळी हे हॉस्पिटल उभं करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील आणि बाहेरील संस्था आणि व्यक्ती यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा याठिकाणी गौरव करण्यात आला . अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी आभार मानले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies