एसीबी इंटरनॅशनल स्कुलमध्ये गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती संपन्न
ओंकार रेळेकर-चिपळूण
कापसाळ येथील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य अशा एसीबी इंटरनॅशनल स्कुलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंती निमित्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी एसीबीचे चेअरमन अमोल भोजने यांनी दोन्ही महापुरुषांबद्दल चित्रक्षेपकाद्वारे माहिती सांगून गौरवोदगार काढले. यावेळी एसीबीचे प्रिंसिपल राकेश भुरण आणि गुणवत्ता विकास अधिकारी नेहा महाडिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.विध्यार्थ्यांना आजच्या दिनाचे महत्व विषद करणारे व्हिडीओ देखील पाठविण्यात आले. पर्यवेक्षक मुकुंद ठसाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यावेळी स्कुलमधील शिक्षिका रिना घाग , आदिती वलावटे, रिमा लटके ,राधिका देवळेकर ,मुद्रा वाजे ,नगमा काझी ,समन्वयक संतोष पिलके,ओंकार रेळेकर , आदेश चिले ,लिपिक सुजित डिगे ,आदी उपस्थित होते.