रस्त्यावर वापरलेले पीपी किट फेकले वाई कचरा डेपो समोरील संतापजनक प्रकार परिसरातील नागरिकांकडून संताप
प्रतिक मिसाळ -वाई/सातारा
पालिकेच्या कचरा डेपो समोरच्या रस्त्यावर वापरलेली पी पी किटस फेकल्याने एकच खळबळ उडाली आहे.शनिवारी रात्री ही किट टाकण्यात आली आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे . वैदयकीय क्षेत्रातील संबधितांनी मोठ्या प्रमाणात पी पी किट्स कचरा डेपो समोरच्या रस्त्यावर टाकली आहेत . संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे . ही किट शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी आणून टाकल्या . उपचार करणाऱ्या रुग्णालयात वापरण्यात येणारे किट्स रस्त्यावर टाकून त्या परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिक परिसरातील नागरिक आंदोलन करणार आहे . याच परिसरात कालबाह्य औषधांचा कचरा अनेकदा टाकण्यात आलेला आहे . करोना बाधितांवर उपचार करताना हे किट्स वापरूनच उपचार केले जातात , त्यानंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावायची असते करोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून शासकीय यंत्रणाद्वारे सर्व पातळीवर खबरदारी घेतली जात आहे . एका बाजूस विना मुखपट्टी व सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई व दंड आकारण्यात येत आहे . आणि वाई शहरातील काही हॉस्पिटल बेजबाबदारपणे उघड्यावर पी पी ई किट व वैद्यकीय कचरा टाकून करोना संकट वाढवत नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत हे खूप गंभीर आणि चिंताजनक आहे . यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून दोषी वर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे .
मुख्यधिकारी नगरपालिका-विद्या पोळ
वाई शहरातील हॉस्पिटल्सचा वैद्यकीय कचरा जमा करून विल्हेवाट लावण्याचा ठेका नेचर इन नीड कंपनीकडे आहे . पालिकेच्या कचरा डेपो समोरील औदयोगिक वसाहतीच्या जागेत सदरचा वैद्यकीय कचरा टाकण्यात आला ही गंभीर बाब आहे . अश्या प्रकारे कचरा टाकणाऱ्यावर धोकादायक कचरा कायद्या नुसार संबंधित विभागाकडून कडक कारवाई करण्यात येईल