सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभाग निमित्त दसरा सीमोल्लंघन निमित्त कोथळीगड आणि ढाक बहिरी येथे दुर्ग सजावट व दुर्ग पूजन
नरेश कोळंबे -कर्जत
सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था गेली १० वर्षांपासून गडकिल्ले संवर्धनाच काम महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर करत आहेत. आजवर संस्थेमार्फत १०००हुन अधिक दुर्गसंवर्धन मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री. श्रमिक गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर दुर्गसंवर्धन चळवळ मोठया प्रमाणात सुरू आहे.या चळवळीत हजारो दुर्गसेवक जोडले गेले आहेत. सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाकडून तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गडकिल्यांचे जतन व संवर्धन गेल्या पाच वर्षांपासून होत आहे. कर्जत मधील कोथळीगडावर संस्थेमार्फत तीन तोफांना तोफगाडे आणि एक प्रवेशद्वार लोकवर्गणीतून बसविण्यात आले आहे. तसेच इतर किल्ल्यावर संवर्धनाचे काम नियमित सुरू आहे . तसेच दसरा सीमोल्लंघन निमित्त सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे किल्ले कोथलीगड व ढाक बहिरी येथे आज पूजन करण्यात आले.
हिंदू परंपरेनुसार दसऱ्याच्या शुभमुहूर्त मानला जातो शिवकाळात दसरा सीमोल्लंघन याचे महत्व गडकिल्ल्यासाठी फार मोठे होते. त्या काळात दसऱ्यानिमित्त गडकिल्ले तोरण लावून सजवले जात असत. शस्त्र पूजन होत असे ,छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात स्वराज्याच्या ३५० किल्ल्यावर हा उत्सव साजरा करत असत. त्या काळात जसे किल्ले होते तसे आज सद्य स्थितीत नाहीत, किल्यांची बरीच पडझड झाली आहे. म्हणूनच
दसरा निमीत्त सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्रातील ४१ किल्ल्यावर दुर्गपुजन झाले.
कर्जत तालुक्यातील कोथळीगड हा किल्ला मराठयांच्या काळात शस्त्र साठ्यासाठी वापरात होता. मराठयांनी या किल्ल्याच्या आधारे मुघलांना पराभूत केले तर ढाक हा किल्ला कर्जत ते पुणे मार्गावरील पहारेकरी आहे. याच दोन किल्ल्यावर सहयाद्री प्रतिष्ठान कर्जत मार्फत परमपवित्र भगवा ध्वजाला मानवंदना देऊन गडाच्या प्रवेशद्वार तटबंदी बुरुजांवर तोरण चढवून दसरा सीमोल्लंघन साजरा करण्यात येत आहे. कोथळीगडावर घनश्याम बोराडे, रोशन बांगर, समीर म्हामुनकर, हरेश मते, प्रणव जंगम, अमित भोईर, सुधिर साळोखे, दिनेश ठाणगे, कुणाल बोराडे, अमोल पानमंद, शुभम मठपती, गणेश धारणे, हे सर्व दुर्गसेवक उपस्थित होते.
आणि ढाक बहिरी किल्ल्यावर गणेश रघुवीर, विश्वास शिर्के, सुधिर भोसले, भावेश देसले, विकास चव्हाण, व सहकारी आदी दुर्गसेवक उपस्थित होते .
कर्जत तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे अनेक मोहिमांवर शेकडो शिवप्रेमींनी येऊन अनेक कामे केली आहेत. मागे झालेल्या कार्यक्रमात किल्ले कोथलिगड येथे मुख्य दरवाजा बसविण्यात आला होता त्यावेळेस महाराष्ट्र भरातील दुर्गप्रेमी नी येत मोठा जल्लोष साजरा केला होता. आज याच गडांवर सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत तर्फे काही शिवप्रेमींनी जात गडांची सजावट तथा गडांचे पूजन करण्याचं काम केलं आहे.
सुधीर सुरेश साळोखे
अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत