लिंगायत धर्म महासभा सांगली जिल्हा कोअर कमिटी निवड जाहीर
महाराष्ट्र मिरर टीम-सांगली
लिंगायत धर्म महासभा महाराष्ट्र राज्य संघटनेची सांगली जिल्हा कोअर कमिटी निवड जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राहुल बापू कोठावळे , उद्योगपती ए. के. चौगुले ( अंकलखोप ), सचिव प्रमोद शेटे यांनी ही निवड जाहीर केली .
मोहन शिवलिंग अजमाने कामेरी , कृष्णा चौगुले, धोंडीराम गंगाराम मगदूम म्हैसाळ, सिदगोंडा रघुनाथ पाटील सावळज, रमेश आप्पाजी श्रिरंबेकर मौजे डिग्रज, शशिकांत महादेव माणगावे कवठेपिरान, आर. एन.पाटील सांगली , सुरेंद्र श्रीशैलप्पा मळली सांगली , सिद्राम नागप्पा सलगरे सांगली, अशोक बाबा कोठावळे सांगली, शिवाप्पा सलगरे मालगाव , चंद्रशेखर कबाडगे मालगाव , मुकुंद बाळासाहेब लकडे विटा, राजेंद्र महादेव माळी ( सरपंच ) सोनी, उल्हास महादेव माळकर सोनी , एम.के . माळी , भारतभूषण परगोंडा पाटील नरवाड , महादेव महालिंग लोहार , प्रा. रवींद्र रायाप्पा कुंभार भोसे, शशिकांत गणपतीे फल्ले सांगलीवाडी, अरविंद धानाप्पा कोष्टी विजयनगर, जी. टी. पाटील कुमठा .
लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा घेणे कामी केंद्र शासन दरबारी योग्य तो प्रस्ताव या संघटनेच्या वतीने सादर केलेला आहे . त्याची पुढील कार्यवाही सुरू आहे . या उपक्रमात प्रत्येक गावचा सहभाग नोंद करण्यासाठी प्रत्येक गावातील शाखा कार्यकारिणी शासनाकडे सादर करण्याची आहे. अद्याप ज्या गावांमध्ये कार्यकारिणी तयार केली नसेल त्यांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.