पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उदघाटन
कुलदीप मोहिते -कराड
मौजे वहागाव ता.कराड येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते, तंटामुक्ती अध्यक्ष बाजीराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचे उदघाटन संपन्न झाले.
जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, माणिकराव पाटील, बी.डी.ओ.डॉ.आबासो पवार, सचिन पवार, शामराव देशमुख, कुलदीप पवार, तुषार पवार, भिकू पवार, बाळासाहेब पवार, शंकर पवार, भिकू पाटील, गणी मुल्ला, आमीन मुल्ला, संभाजीराव पवार, पै.कृष्णत पवार, बाबा पाटील, सुभाष पवार, शिवाजी पवार, प्रवीण माळी, शिवाजी सुतार, वसंत सुतार, तानाजी पवार, रावसाहेब पवार, दत्तात्रय जाधव नानासो यादव, बबन कदम व ग्रामस्थ उपस्थित होते.