घरात घुसून वस्तूंची तोडफोड,वीज प्रवाह खंडीत होण्याच्या घटनांमध्ये वाढ,मर्कटलीलाने खटावकर वैतागले
Team Maharashtra Mirror10/06/2020 07:02:00 AM
0
घरात घुसून वस्तूंची तोडफोड,वीज प्रवाह खंडीत होण्याच्या घटनांमध्ये वाढ,मर्कटलीलाने खटावकर वैतागले
मिलिंदा पवार-खटाव
खटाव परिसरात एकाच वेळी माकडांची टोळी घरात घुसून वस्तूंचे नुकसान करत आहे तसेच अंगणात वाळवण घातले असता नासधूस करत आहे एखाद्या चे घराचे दार अथवा खिडकी उघडी दिसली असता यावर ही माकडांची टोळी चा मोर्चा घरात घुसतो व सर्व वस्तूंचे नुकसान करतो आहे घरातील खाण्याच्या साहित्यावरही ताव मारत आहे त्यामुळे वानर टोळी ची धास्ती सर्व ग्रामस्थांनी घेतले आहे घरावरील कौलांवर लोंबकळयामुळे नुकसान होत आहे तसेच विजेच्या तारांवर उड्या मारून, त्यांना पकडून ही माकडे कसरत करत झोका घेत जात असल्यामुळे जागोजागी विजेच्या तारा तुटल्या असून त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे याचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे तसेच विजवाहक तारांना शॉक लागून मरत आहेत तर काही चवताळून नागरिकांच्या अंगावर येण्याच्या घटना देखील घडत आहेत त्यामुळे लहान मुले जेष्ठ नागरिक तरुणी महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
वन विभागाने या माकडांचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागलीय.