Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

खराब रस्ते प्रकरणी बळीराजा पार्टीचे धरणे

 खराब रस्ते प्रकरणी  बळीराजा पार्टीचे धरणे 


उमेश पाटील -सांगली 



 तालुक्यातील विविध भागांतील दुर्लक्षित रस्त्यांचा प्रश्नाबाबत बळीराजा पार्टी महाराष्ट्रच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे केले . रस्त्याबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती . 


              तहसीलदार बी. जे. गोरे यांनी याप्रकरणी लक्ष घालून पंचायत समितीच्या बांधकाम खात्याशी चर्चा केली व रस्त्याचे प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या .


             पंचायत समितीच्या बांधकाम खात्याचे शाखा अभियंता के. डी. साळुंखे यांनी पंचायत समितीकडील दुर्लक्षित रस्त्यांच्या बाबतचा अहवाल तहसीलदारांना देण्यात आला . त्यानंतर तहसीलदार , तसेच बाळासाहेब रास्ते , के. डी. साळुंखे यांच्यात सविस्तर चर्चा झल्यांनातर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले . या आंदोलनात बबन निकम , नामदेव बाबर , सचिन कोळेकर , बाळासाहेब कोळेकर , विठ्ठल सुर्यवंशी यांनी भाग घेतला होता .


              राजर्षी शाहू विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रा.दादासाहेब ढेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष महेश पवार ,  माजी सभापती सुरेखाताई कोळेकर, बाळासाहेब पाटील बसपाचे शंकर माने यांनी आंदोलनास पाठिंबा दिला होता .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies