राष्ट्रवादी पक्षातर्फे पत्रकारांना कोविड योध्दा सन्मानपत्र देवून गौरव
रविंद्र कुवेसकर-उतेखोल/माणगांव
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी पत्रकारांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले तर खासदार सुनिल तटकरे यांनी आपत्ती व कोरोना संकटकाळात लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणुन गणल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या लेखणीतून आंम्हाला चांगल काम करता आल, असे सांगत पत्रकारांचे विशेष अभिनंदन केले आहे. या प्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे, पक्षाच्या जिल्हाध्यक्षा गीता पालरेचा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, जि. प. सभापती गीता जाधव, माणगांव तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, तालुक्याच्या महिला अध्यक्षा संगीता बक्कम, जेष्ठ नेते शेखर देशमुख, प्रभाकर उभारे, जिल्हा युवती अध्यक्षा ॲड. सायली दळवी, तालुक्यातील सर्व, सरपंच, नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वच पत्रकारांचा सन्मान करण्यात आला आहे.