श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव साध्या पध्दतीने साजरा होणार - तहसिलदार सौदागर तांदळे
राम जळकोटे-तुळजापूर.
संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार असुन मंदीरात रॅपिड ॲन्टिजन तपासणी करुनच मंदीरात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार सौदागर तांदळे यांनी मंगळवार दि. 6 ऑक्टोबर रोजी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
यावेळी बोलताना तहसिलदार तांदळे पुढे म्हणाले की, ऑक्टोबर महिना कोरोना प्रार्दुभाव पार्श्वभूमीवर महत्वपुर्ण महिना आहे. त्यामुळे शासनाने दि. 30 सप्टेबर 2020 रोजी दिलेल्या गाईडलाईन नुसार शारदीय नवराञोत्सव सामाजिक अंतर पाळुन साधेपणाने साजरा केला जाणार आहे. रॅपिड ॲन्टिजन तपासणीत पाँजिटीव्ह आढळल्यास त्यावर तात्काळ क्वारटांईन सेंटर मध्ये उपचार सुरु केले जाणार आहेत. शारदीय नवराञोत्सवातील महत्त्वाचे धार्मिक विधी म्हणजे शुक्रवार दि. 9 रोजी मंचकी निद्रा, दि. 17 रोजी घटस्थापना व दि. 30 ऑक्टोबर रोजी पोर्णिमा या धार्मिक विधीसाठी गरजेनुसार कमीत कमी मंहत, पुजारी, सेवेदार, मानकरी यांना मंदीरात प्रवेश दिला जाणर आहे व अनावश्यक गर्दी टाळली जाणार असल्याचे यावेळी सांगितले.