जागतिक मानसिक आरोग्य दिना निमित्त
श्रद्धा फाऊंडेशन तर्फे दहीवली ग्रामपंचायत मधील गरजूंना महिन्याभराची शिदोरी!
ज्ञानेश्वर बागडे
महाराष्ट्र मिरर टीम कर्जत
मनोरुग्णांना आधार आणि उपचार सेवा देणाऱ्या रमण मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉक्टर भरत वाटवानी यांच्या श्रद्धा फाऊंडेशन द्वारे कोरोना महामारीत गोर गरीब गरजूंना मदतीचा हात दिला आहे. आज जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत दहीवली ग्रामपंचायत मधील ३५हून अधिक गरजू कुटुंबीयांना एक महिना पुरेल इतकं अन्न धान्य वाटप करण्यात आले. यावेळी श्रद्धा फाऊंडेशन मार्फत डॉ.उदय, सचिन म्हसकर, ध्रुव बडेकर, मधान नथान, नितीश शर्मा, शाहनिर अख्तर तसेच भाजपा रायगड जिल्हा सरचिटणीस रमेश मुंडे, सामाजिक कार्यकर्ते केशव तरे, प्रल्हाद राणे हे उपस्थित होते.
कोरोना काळात श्रद्धा फाऊंडेशन तर्फे कर्जत तालुक्यातील अनेक गरजूंना मदतीचा हात दिला असून मानसिक आधारासह दैनंदिन जीवनात उदरनिर्वाहासाठी महिनाभर पुरेल इतके अन्न धान्य वाटप केले आहे. या कामात रमेश मुंडे यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील अश्या घटकापर्यंत ही मदत पोहचवत आहेत आणि दहीवली ग्रामपंचायत मध्येही केशव तरे यांच्या पाठपुराव्याने त्वरीत ही मदत घेऊन ते स्वतः श्रद्धा फाऊंडेशन सोबत उपस्थित राहिले.