संतोष पवार यांच्या मृत्यूची राज्यस्तरीय चौकशी व्हावी- सुनील तटकरे
पवार कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी सर्वतोपरी मदत-अदिती तटकरे
महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत
रायगड जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्यावर आरोग्य यंत्रणेकडून व्यवस्थित उपचार झाले नाहीत याची आपल्याला खात्री आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून येणारा अहवाल अजून प्रलंबित असून राज्य सरकारने एक समिती नेमून चौकशी करावी असा आपला आग्रह असल्याची माहिती रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
संतोष पवार यांचा कोविड मुळे मृत्यू झाला असल्याने त्यांच्या कुटुंबाला राज्य सरकारच्या विमा कवच चा लाभ मिळावा यासाठी आपण स्वतः सकारात्मक असल्याचे आश्वासन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी कर्जत तालुक्यातील पत्रकारांना दिले आहे.
9 सप्टेंबर रोजी कर्जत माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांना कोरोना वर उपचार नेण्यासाठी कर्जत येथून नवी मुंबईत नेले जात असताना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमुळे रुग्णालयात जाण्याआधी अर्ध्या रस्त्यात मृत्यू झाला होता.संतोष पवार यांचा मृत्यू होऊन 25 दिवस लोटले तरी अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही.त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी ही मागणी करण्यासाठी कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी आज 4 ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची सुतारवाडी येथे जाऊन भेट घेतली.त्यावेळी संतोष पवार यांचे पुत्र मल्हार संतोष पवार यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यू आधीची आणि मृत्यू ओढवत असलेली सर्व हकीकत खासदार सुनील तटकरे यांना कथन केली.त्यानंतर आपल्याला अशी कोणतीही माहिती आधी द्यायला हवी होती.मात्र तरीही आपण उद्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मंत्रालयात भेट घेऊन संतोष पवार यांच्या मृत्यू प्रकरणाची शासनाने वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याचे आश्वासन दिले.मागील 25 दिवसात जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला मृत्यू प्रकरणाचा अहवाल सादर केला नाही?असा प्रश्न जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉ माने यांना फोन करून विचारला.जिल्हा प्रशासनाने संतोष पवार यांच्या मृत्यूचा अहवाल तात्काळ शासनाला केल्यानंतर राज्य सरकारने चौकशी करावी यासाठी आपला पाठपुरावा राहणार आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांनी बीड जिल्ह्यात पत्रकारांशी संवाद साधताना कोरोनाचा संसर्ग झालेल्या पत्रकारांना 50 लाखाचे विमा कवच दिले जाईल असे जाहीर केले होते.त्यानुसार शासनाने दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी आम्ही सर्व जण मागणी करीत आहोत.पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जात असून पत्रकार अत्यावश्यक सेवेत आणि कोरोना काळात देखील पत्रकारिता करीत आहेत.आपल्या वाहिनीसाठी लॉक डाऊन काळात काम करीत असताना माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचेकोरोना संसर्ग होऊन मृत्यू झाला आहे.त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करीत असताना संतोष पवार यांचा मृत्यू झाला असल्याने शासनाचे त्यांच्या कुटुंबाला विमा कवच याचा लाभ द्यावा अशी आग्रही मागणी करण्यासाठी कर्जतचे पत्रकार रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांनी भेट घेतली.त्यावेळी संतोष पवार यांच्या कुटुंबाला शासनाचे कोविड विमा कवच मिळावे यासाठी मंगळवारी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन करणार असल्याचे आश्वासन सुनील तटकरे यांनी ही मागणी करणारे कर्जत येथील पत्रकारांना दिले.तर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आपण जिल्हाधिकारी यांना संतोष पवार यांचा मृत्यू कोविड मुळे झाला आहे याचा अहवाल राज्य सरकारला पाठवण्याची सूचना केली आहे.त्याचवेळी राज्य सरकार कडून पवार कुटुंबाला आर्थिक मदत होण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत असे आश्वासन अदिती तटकरे यांनी यावेळी दिले.
त्यावेळी जेष्ठ पत्रकार विजय मांडे,संतोष पेरणे यांच्यासह पत्रकार दर्वेश पालकर,कांता हाबळे,विकास मिरगणे, संजय अभंगे,गणेश पवार,बाळू गुरव,दिनेश सुतार,अजय गायकवाड, गणेश पुरवंत आदी उपस्थित होते.