किलज गावात पावसाचा कहर ; गावातील घरे झाली उध्वस्त .
राम जळकोटे-उस्मानाबाद
तुळजापूर तालुक्यातील किलज आणि परिसरात काल रात्री पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.यात गावामध्ये अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले तर नदीलगत घरे असलेल्या लोकांची घरे ही चक्क उध्वस्त झाली आहेत.गावालगत असलेल्या तलावाशेजारी ५ , ६ कुटुंब राहत होती. रात्री जोर धरलेल्या पावसाने दिवस भर ब्रेकच घेतला नाही आणि दुपारी २ च्या सुमारास गावातील नदीला पूर स्थिती निर्माण होऊन नदीलगत असलेली घरे गावातील नागरिकांची जनावरे , आणि उपयोगी वस्तू ह्या वाहून गेल्या आहेत.गावातील नदीलगत घर असलेल्या पंडित पटणे, शांतिर पटणे, आणि महादेव पटणे या लोकांची घरे ही पाण्याच्या अखंडित प्रवाहाबरोबर वाहून गेली तर गृहउपयोगी वस्तूंसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नागरिकांमधून आता मदतीची मागणी प्रशासनाकडे होत आहे.