स्वातंत्र्य सैनिक मानसिंगराव शिंदे यांचे निधन
प्रतिक मिसाळ सातारा
-गोवा मुक्ती चळवळीतील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मानसिंगराव शिंदे आण्णा (मु.पो. वेळेकामटी ता.जि. सातारा )यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दिर्घ आजाराने सातारा येथील खाजगी हाॅस्पिटलमध्ये काल रात्री ८:३० चे सुमारास निधन झाले. गेले २८ दिवस ते हाॅस्पिटलमध्ये कोरोना व्याधीवर उपचार घेत होते. या आजारातून ते पूर्ण बरे झाले आणि दोन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. परंतु कालरात्री अचानक हार्ट अटॅकने त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात् त्यांची पत्नी, मुले, मुली, सुना ,जावई आहेत.
सातारा तहसिलदार कार्यालयद्वारा शासनाचेवतीने पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
दि.१५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील जेष्ठ स्वातंत्र सैनिक म्हणुन मानसिंगराव शिंदे व प्राचार्य डॉ आर के शिंदे यांचा सत्कार नवी दिल्ली येथे होणार होता. परंतु कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते घरी जाऊन सत्कार करण्यात आला होता.