नळदुर्ग येथे वाहतुक नियंत्रक महेश डुकरे यांनी सफाई कामगाराचा केला वाढदिवस साजरा
घडवलं माणुसकीचे दर्शन
राम जळकोटे-उस्मानाबाद
येथील बसस्थानकात रोजनदारी सफाई कामगार म्हणून काम करणारे आकाश हलालकर यांचा वाढदिवस वाहतुक नियंत्रक महेश डुकरे यांनी बसस्थानकातच साजरा करून मानवतेचे दर्शन दिले आहे.
हजारो रुपये खर्च करून आपल्या मुलाचा किंवा स्वतः चा वाढदिवस साजरा करणारे लोक अनेक आहेत. परंतु रोजंदारीवर काम करणाऱ्या आपल्या सफाई कामगाराचा साध्या पद्धतीने का असेना वाढदिवस साजरा करुन सफाई कामगाराच्या जीवनात आनंद फुलवणारे नळदुर्ग ता.तुळजापूर येथील बसस्थानकाचे वाहतुक नियंत्रक महेश डुकरे यांनी बसस्थानक परिसराची प्रामाणिकपणे स्वच्छता करणारे सफाई कामगार आकाश हलालकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा पुष्पहार पुष्पगुच्छ देवून केक भरवून वाढदिवस साजरा करून मानवतेचा धर्म जोपसला. याप्रसंगी पत्रकार ईरफान काझी, एस.के.गायकवाड, महिला वाहक वैशाली राठोड, चालक प्रभाकर सराटे, वृतपत्र विक्रते भारत यादगीरे उपस्थित होते.