Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

शिरसे ठरली कर्जत तालुक्यातील "स्मार्ट ग्रामपंचायत"!!

 शिरसे ठरली कर्जत तालुक्यातील "स्मार्ट ग्रामपंचायत"!!


ज्ञानेश्वर बागडे-
महाराष्ट्र मिरर टीम -कर्जत



ग्रामपंचायतचा कारभार पारदर्शी, लोकाभिमुख,विकासाभिमुख व ग्रामस्थांच्या सहकार्याचा असावा यासाठी ग्रामविकास मंत्रालयाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत .या योजने अतंर्गतच तालुका व जिल्हास्तरावर स्मार्ट ग्रामपंचायत स्पर्धा घेण्यात येतात या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सहभागी झालेल्या ग्रामपंचायती मध्ये एकूण अकरा ग्रामपंचायती विजयी ठरल्या आहेत .या विजयी ग्रामपंचायत मध्ये कर्जत तालुक्यातील शिरसे ही एकमेव ग्रामपंचायत विजयी ठरली आहे .100 गुणापैकी 80 गुण मिळवत शिरसे ग्रामपंचायत 2018-19 तालुक्यातील एकमेव "स्मार्ट ग्रामपंचायत" ठरली आहे .

 राज्यशासना तर्फे या स्पर्धेत विजयी ठरलेल्या ग्रामपंयतीना पन्नास लाख रूपयाचे बक्षीस देण्यात येते .व्यवस्थापन,दायीत्व ,

पारंपरिक उर्जा ,पर्यावरण विषयी कार्य ,प्रशासकीय पारदर्शकता या मुद्याच्या आधारे घेतलेल्या स्पर्धेत शिरसे ग्रामपंचायत अव्वल ठरली आहे .




 

आरती संदिप भोईर ,सरपंच शिरसे ग्रामपंचायत

स्मार्ट ग्रामपंचायत स्पर्धेत माझी ग्रामपंचायत अवल ठरल्याचे समाधान असुन माजी संरपच व शिवसेना नेते संतोषशेठ भोईर यांचे मार्गदर्शनासह उपसरपच ,सदस्य व प्रशासकीय आधिकारी यामध्ये समन्वय साधत ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामे राबवली जात आहेत ,महिलांचे आरोग्याचे प्रश्न ,आदिवासी वाड्याचा विकास विशेषतः आदिवासी मूलीच्या शिक्षणासाठी विशेष उपक्रम राबणार आहे .

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. जयभीम-लालसलाम काॕम्रेड आरती भोपतराव-भोईर

    ReplyDelete

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies