कंठी खून प्रकरणातील फरार तिघे आरोपी एलसीबी च्या जाळ्यात
सोलापूर मधील हुलजंती येथून ताब्यात
उमेश पाटील -सांगली
जत तालुक्यातील कंठी येथे धनाजी नामदेव मोटे (वय ४३)याचा गोळ्या झाडून व निर्घृणपणे डोक्यात हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. या खुनातील फरार असलेल्या तीन आरोपींना सांगलीच्या गुन्हे अन्वेषण विभागाने हुलजांती येथून ताब्यात घेतले आहे,
जत तालुक्यातील कंठी येथील गुन्हेगार धनाजी मोटे याचा अनैतिक प्रकरणातून गुरुवारी रात्री खून करण्यात आला होता.या खून प्रकरणी चौघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुख्य आरोपी नागेश भीमा लांडगे यास पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली होती, त्यास न्यायालयाने 14 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती.
तर मोटे खून प्रकरणातील तिघे संशयित अद्याप फरारी होते.या तिघांच्या अटकेसाठी तीन पथके वेगवेगळ्या भागात रवाना झाले होते.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाने दोनच दिवसात या प्रकरणातील फरार आरोपीं गोविंद नागेश लांडगे,मुरलीधर मधुकर वाघमारे,श्रीधर मधुकर वाघमारे,यांना मंगळवेढा तालुक्यातील हुलजती येथून ताब्यात घेण्यात आला आहे. या आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ,पोलीस उपनिरीक्षक प्रविण शिंदे,अभिजित सावंत,पोलीस हवालदार ,जितेंद्र जाधव,राजू शिरोलकर,राजाराम मुळे,संदीप गुरव संदीप पाटील,संदीप नलवडे,अनिल कोळेकर यांनी केली.