स्टार प्रचारकांच्या यादीत शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांचे नाव बिहार निवडणुकीची शिवसेनेने दिली मोठी जबाबदारी
ओंकार रेळेकर-चिपळूण
आगामी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाने शिवसेनानेते खासदार विनायक राऊत यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे,शिवसेना पक्षातील महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांमध्ये
खा.विनायक राऊत यांच्यावर बिहार निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देऊन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी पुन्हा एकदा खा.राऊत यांचा सन्मान केला आहे,
बिहार निवडणुकीत ५० जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती यापूर्वी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली होती. दरम्यान, आता शिवसेनेनं बिहार निवडणुकांसाठी २० जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांच्या नावांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.