अरबवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने आ.महेश शिंदे यांना कोविड योध्दा पुरस्कार प्रदान
प्रतिक मिसाळ कोरेगाव
अरबवाडी विकास सेवा सोसायटी आणि अरबवाडी ग्रामपंचायत यांच्या सौजन्याने आपल्या गावाला चांगले पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून RO सिस्टीम बसवली होती त्याचे उद्घाटन व विविध कार्यक्रमांचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते या प्रसंगी कोविड . १ ९ या महामारी आजाराच्या निर्मूलन साठी , सर्व सामान्य जनतेच्या जीविताच्या सुरक्षितते साठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना "कोविड योद्धा"पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . आमदार महेश शिंदे यांना त्यांच्या सेवाकार्याबद्दलच्या सन्मानार्थ अरबवाडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आणि सर्व संचालक आणि अरबवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सर्व सदस्य यांच्या वतीने आमदार महेश शिंदे यांना कोविड महायोद्धा पुरस्कार अरबवाडी गावाचे यशस्वी उद्योजक शहाजी शेठ गोळे यांचे हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले . तसेच अरबवाडी गावातीलअंगणवाडी सेविका आणि पळशी रुग्णालयातील डॉक्टर या सर्वानी खुप त्रास सहन करून आपली सेवा बजावली म्हणून त्याना आ.शिंदेच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून गौरवण्यात आले व रोख रक्कम बक्षिस म्हणून देण्यात आली.यावेळी सरपंच, सद्स्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.