श्रीवर्धन तालुक्यासह इतर ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्क "कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर"
मोबाइल नेटवर्क पुरविणाऱ्या कंपन्यांनी गाठला निर्लज्जपणाचा कळस.
अमोल चांदोरकर - श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यासह अनेक गावांत सर्वच मोबाइल कंपन्यांच्या नेटवर्क ची बोंब अनेक महिन्यांपासून पाहायला मिळते आहे.विविध माहिती ऑनलाइन शिक्षणासह करमणुकीचे साधन बनलेले अँड्रॉईड मोबाइल सध्या शोभेची वस्तू बनले आहे .इंटरनेट वापरासाठी तासन तास रेंज येण्याची प्रतीक्षा करावी लागते आहे किंवा घराबाहेर ,छतावर रेंज शोधावी लागते आहे.मोबाइल कंपन्यांनी अक्षरशः निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे त्यामुळे मोबाइल धारक त्रस्त झाले आहेत.
संगणकाच्या युगात मोबाइल मानवाची एक गरज बनली आहे .मोबाईलमुळे संपर्क साधण्यासह सर्व गोष्टी सहजरित्या उपलब्ध होत असल्याने मोबाईल जीवनावश्यक वस्तू बनला आहे .मात्र श्रीवर्धन तालुक्यासह अनेक ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क कंपन्यांची बोंब मिळते फोर जी नेटवर्कच्या नावाखाली टू जी स्पीड देखील पकडत नसल्याने ऑनलाइन कामे खोळंबल्याचे दिसते आहे त्याचप्रमाणे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना नेटवर्क शोधण्यासाठी कसरत करावी लागत आहे काही ग्रामीण भागात रेंज येणे जाणे ,मधेच फोन कट होणे ,फोन न लागणे ,आवाज स्पष्ट न येणे ,इंटरनेट न चालणे ,अशा एक ना अनेक समस्या सतत उद्भवत आहेत.शेकडो रुपयांचे केलेले मोबाइल रिचार्ज फुकट जात असल्याने मोबाईल धारक संताप व्यक्त करीत आहेत मात्र त्याचे कोणत्याही मोबाईल नेटवर्क पुरविणाऱ्या कंपन्यांना सोईरसुतक दिसून येत नसून नेटवर्क कंपन्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला व त्याचा नाहक त्रास मनस्ताप सर्वसामान्य मोबाईल धारकांना होत आहे असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण ही संकल्पना शासनाकडून राबविली जात आहे मात्र नेटवर्क पुरविणाऱ्या कंपन्यांच्या सेवेला घरघर लागल्याने नेटवर्क शोधण्यासाठी पालकांना व त्यांच्या सोबत शिक्षकांना देखील कसरत करावी लागते आहे त्यामूळे विदयार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .
अंजना ज्ञानदिप भोईनकर ,शिक्षिका
सध्या श्रीवर्धन मधील काही भागात खूप नेटवर्कची समस्या आहे.ग्राहकांची संख्या जास्त असून नेटवर्क पुरविणाऱ्या टॉवर ची मर्यादा कमी असल्याने अशी समस्या सतत येत आहे त्यावर कंपनी तर्फे काम चालू असून लवकरच नेटवर्क सुरळीत होईल .
नितीन जॉर्डन ,नेटवर्क इंजिनिअर ,व्होडाफोन-आयडिया