मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार
Team Maharashtra Mirror10/09/2020 08:47:00 PM
0
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर
दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार
महाराष्ट्र मिरर टीम -खोपोली
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत.किमी 36 वर अमृतांजन ब्रिज आणि फुडमॉल जवळ हे अपघात झाले आहेत . पहिल्या अपघातात पुण्याहून मुंबईच्या दिशेने साखर घेऊन निघालेला ट्रक कलंडला त्यात एक जण ट्रकखाली दबून ठार झाला आणि एक जण जखमी झालाय तर दुसऱ्या अपघातात एक ट्रेलर दुसऱ्या ट्रेलरला पाठीमागून धडकल्याने या अपघातातही एक जण ठार एकजण जखमी झालाय.जखमींना विजय भोसले आणि टीमने खोपोली येथे हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी हलवले आहे.पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. या अपघातात बोरघाट पोलीस यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, लोकमान्य हॉस्पिटलची यंत्रणा, स्थानिक युवक आणि अपघातग्रस्तांच्या मदतीला या टीमच्या सदस्यांनी मदत केली.