स्थापत्य समिती (शहर)अध्यक्षपदी श्रद्धा जाधव तर स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्षपदी श्रीकांत शेट्ये यांची निवड
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२०-२१ च्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या माजी महापौर, नगरसेविका श्रद्धा जाधव या १७ मते मिळवून त्या विजयी झाल्या, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुरेखा लोखंडे यांना १३ मते मिळाली.
उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दत्ता पोंगडे यांना १७ मते मिळून ते विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार कृष्णावेणी रेड्डी यांना १३ मते मिळाली. या निवडणुकीत ३५ सदस्यांनी भाग घेतला. तर ०५ सदस्य तटस्थ राहिले. स्थापत्य समिती (शहर) या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून मुंबईच्या महापौर किशोर किशोर पेडणेकर या होत्या.
स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार श्रीकांत शेट्ये हे १७ मते मिळवून विजयी झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. सागरसिंग ठाकुर यांना १२ मते मिळाली. एकूण ३६ सदस्यांपैकी २९ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. ०२ सदस्य अनुपस्थित होते, तर ०५ सदस्य तटस्थ राहिले.
तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दिनेश कुबळ यांना १७ मते मिळवून ते विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रतिभा शिंदे यांना ११ मते मिळाली. या निवडणुकीत एकूण २९ सदस्यांनी भाग घेतला. या निवडणुकीत ०१ मत अवैध ठरले, ०५ सदस्य तटस्थ राहिले तर ०२ सदस्य मतदानाला अनुपस्थित होते,
स्थापत्य समिती (उपनगरे) या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून मुंबईचे उपमहापौर सुहास वाडकर हे होते.