पर्यटन व्यवसाय बंदीचा श्रीवर्धनला चार कोटींचा फटका
कोरोना संक्रमणामुळे अद्यापही पर्यटन व्यवसाय मंदीत, व्यवसाय सुरू होण्याची प्रतीक्षा
नगरपालिकेला देखील ४लाख ८८ हजारांच नुकसान
अमोल चांदोरकर -श्रीवर्धन
गेले सात महिने कोरोना संक्रमणामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे श्रीवर्धनला शहराला चार कोटी रुपयांचा फटका बसला आहे.श्रीवर्धनमधील आर्थिक चलन पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. प्रतिवर्षी श्रीवर्धन शहरात साठ हजाराहून जास्त पर्यटक येत असतात. प्रतिवर्षी श्रीवर्धन शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या १२ हजार गाड्यांची नोंद श्रीवर्धन नगरपालिकेकडे आहे. या गाड्यांकडून वर्षा खेरीज जमा होणारी पर्यावरण निमंत्रण व स्वच्छता फी ४लाख ८८ हजाराचे पालिकेचे देखील नुकसान झालं आहे.
श्रीवर्धन शहरात घरगुती पर्यटन व्यावसायीक हॉटेल मोठ्या प्रमाणात चालतात. मार्च पासून कोरोनामुळे ऐन हंगामात पर्यटन व्यवसाय बंद झाल्यामुळे याचा मोठा फटका पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या उद्योग धंद्यांना बसला आहे. त्याचबरोबर श्रीवर्धन मधील मासे विक्रेते, किराणा छोटे मोठे दुकानदार, रिक्षा चालक, वाहतूक व्यवस्था यांच्यावर देखील याचा फटका बसला आहे. त्यानंतर ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात सर्वांवरच मोठं संकट उध्वभावल होत. त्यामुळे आता पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरू होण्याची हळूहळू चिन्ह दिसत आहेत. मात्र आधीच देशभरात असलेली मंदी त्यात चक्रीवादळात झालेलं नुकसान त्यामुळे पुन्हा व्यवसाय उभारताना मंदीचे मोठे सावट उभे आहे. त्यामुळे पुन्हा पर्यटन व्यवसाय सुरळीत होण्याच्या प्रतीक्षेत श्रीवर्धन मधील पर्यटक व्यावसायिक व पर्यटनावर आधारित उद्योग करणारे नागरिक असल्याचे दिसत आहेत.
देशावर आलेला कोरोना सारखं सावट त्यानंतर श्रीवर्धनला आलेल्या चक्रीवादळाचा फटका यातुन सुद्धा श्रीवर्धनवासिय सावरले असुन आता छोटे मोठे उधोग धंदे सुरु होण्याचे संकेत दिसत किंबहुना पर्यटक येण्याने या भागाला दळण वळणाची गती नक्कीच प्राप्त होईल
जितेंद्र सातनाक, नगराध्यक्ष