काढणीस आलेले भात पिक पावसाने केलं भुईसपाट
उमेश पाटील -सांगली
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परीसरात गेल्या चार दिवसांपासुन पावसाची संततधार सुरुचअसल्याने गुरुवारी दुपारी चार वाजता धरणाच्या मुख्य सांडव्यातुन पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.पडत असणाऱ्या पावसामुळे काढणीस आलेले भात पिक भुईसपाट झाले आहे.सलग चार दिवस पडत असणाऱ्या पावसामुळे भात,ऊस,भुईमूंग पिकात पाणी साचुन राहीले आहे.धरण प्रशासनाने धरणात येणार्या पाण्याची आवक लक्षात घेऊन गुरुवारी दुपारी चार वाजता धरणाच्या मुख्य सांडव्यातुन एक हजार 924 क्युसेक तर विध्युत निर्मीती केंद्रांतुन 600 क्युसेक असे एकुण 2 हजार 524 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पाञात सोडल्याने वारणा नदी तुडुंब भरुन वहात आहे.
शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे हातातोंडाशी आलेले पीक नुकसानीच्या मार्गावर आहे या परतीच्या पावसामुळे वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ मिळणार नसल्याची भावना बळीराजाच्या तोंडून ऐकली जात आहे हा परतीचा पाऊस जर असा चार दिवस अजून राहिला तर संपूर्णपणे शंभर टक्के पीक वाया जाणार आहे या भीतीच्या छायेखाली बळीराजा आहे
वर्षभर केलेली मेहनत वाया जाते की काय अशी भीती निर्माण झाली आहे
कोरणा मुळे माणसाची माणुसकी हरवलेला शेतकरी या परतीच्या पावसाने पुन्हा एकदा संकटात सापडला आहे या परतीच्या पावसामुळे शेतकरी राजाच्या डोळ्यातील पाणी येत आहे
भात पीक काही शेतकऱ्यांची कापून टाकलेल्या शेतामध्येच असून
पाण्यावर तरंगत असलेले चित्र पाहावयास मिळत आहे तर काही ठिकाणी भात मळणी केलेले पिंजर कुजत असलेले पहावयास मिळत आहे
शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून पाऊस उघडण्याची वाट बळीराजा पाहत आहे त्यामुळे