कमी कालावधीत जास्तीत जास्त नुकसान भरपाई श्रीवर्धन तालुक्यालाच :खासदार सुनील तटकरे
श्रीवर्धन व म्हसळ्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे
विजय गिरी -श्रीवर्धन
कोरोनाच्या काळात सर्वांच्या गाठीभेटी थांबल्या म्हणून आज कार्यकर्ता शिबिराच्या माध्यमातून भेट घेत आहे ,महाराष्ट्रात सुद्धा केंद्राप्रमाणे भाजप सत्तेत येईल अशी हवा निर्माण केली गेली होती ,अनेक जण राष्ट्रवादी पक्ष सोडून गेले ,मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणार्यांना घरी बसवण्याचे काम 80 वर्षे वयाच्या योध्याने शरद पवार साहेबानी केले ,कोणालाही स्वप्नात देखील वाटले नव्हते कि अशाप्रकारचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत बसेल आणि 105 आमदार असलेला पक्ष घरी बसेल ,हि किमया फक्त शरद पवार साहेबच करू शकतात .आज संपूर्ण देश नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून विद्यमान राज्य सरकार अतिशय चांगले काम करत आहे. कमी कालावधीत जास्तीत जास्त नुकसान भरपाई या तालुक्याला मिळाली ,दुर्दैवाने विरोधक नैसर्गिक आपत्तीत सुद्धा राजकारण साधत आहेत ही बाब खेदाची आहे असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले. श्रीवर्धन मधील नगरपरिषद शाळा नंबर एक मध्ये श्रीवर्धन तालुका कार्यकर्ता मेळाव्याच्या प्रसंगी खासदार सुनील तटकरे बोलत होते . श्रीवर्धन म्हसळा या दोन्ही तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. 2011साली श्रीवर्धन मध्ये प्रथमता नगर परिषदेवर ती सत्ता मिळविण्यात राष्ट्रवादी-काँग्रेस यशस्वी झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा वारू पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये संचारला आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मला अतिशय अल्प मताने पराभव स्वीकारावा लागला मात्र 2019 ला संपूर्ण रायगड जिल्ह्यातील मतदारांनी मला भरघोस मत देऊन विजयी केले. लोकसभेनंतर विधानसभेमध्ये विद्यमान पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या वरती मतांचा पाऊस पाडण्यात आला. श्रीवर्धन मधील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवणार आहेच त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी त्याला सक्षम करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. गेल्यास सरकार ने प्रचार यंत्रणा राबवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंबहुना काँग्रेस या दोन्ही पक्षांना विरोधी नेतेपद सुद्धा मिळणार नाही अशी वल्गना केली होती. विरोधी पक्षनेते पद हे बहुजन आघाडीला मिळेल असे तत्कालीन मुख्यमंत्री म्हटले होते. मात्र शरद पवार यांच्या जादूने भाजपला विरोधी बाकावर बसवण्यात भाग पाडले.
आजमितीस विद्यमान राज्य सरकार कोरोना व चक्रीवादळ या दोन्ही नैसर्गिक आपत्तींला समर्थपणे सामोरे जात असताना भाजपकडून चुकीच्या पद्धतीचे राजकारण केले जात आहे. सर्वसामान्य घटकाच्या आरोग्याचा प्रश्न विचारात घेऊन विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण विचारांशी आज पर्यंत मंदिर बंद ठेवले आहेत मात्र विरोधक घंटानाद करून मंदिर सुरू करण्याविषयी आग्रही आहेत. भाजप करत असलेलं राजकारण हे पूर्णतः चुकीचे असून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणार आहे. असे सुनील तटकरे यांनी सांगितले तटकरे पुढे म्हणाले रायगड जिल्हा सर्व क्षेत्रामध्ये अग्रणी राहण्याच्या दृष्टिकोनातून मी माझा पक्ष सदैव प्रयत्नशील आहे. रायगड मधील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण धोरणात्मक निर्णय घेत भक्कम अशी पावले उचलली आहेत आगामी काळात रायगड जिल्ह्यातील पर्यटन हे वृद्धीगंत झाल्याचे आपल्याला दिसून येईल. श्रीवर्धन म्हसळा माणगाव तळा अलिबाग याठिकाणी चक्रीवादळाने अक्षरशः थैमान घातलं चक्रीवादळाच्या दिवशी सबंध रात्रभर मी झोपू शकलो नाही. डोळ्यांमधून अश्रूच्या धारा वाहत होत्या माझा सर्वसामान्य रायगडकर चक्रीवादळाच्या फेऱ्यांमध्ये अडकला होता हे दुःख पचवून मी, पालकमंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते संपूर्ण शक्तीनिशी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरलो. जनतेला जास्तीत जास्त मदत निधी कसा उपलब्ध करून देण्यात येईल या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केले व त्यामध्ये मी यशस्वी झालो. असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अनिकेत तटकरे म्हणाले कि, पूर्वी पक्षाची मिटिंग लावायची म्हटली कि हॉल भरेल कि नाही याची धास्ती वाटायची मग छोटाश्या हॉल मध्ये मिटिंग घावी लागायची ,आता चित्र बदलले आहे ,श्रीवर्धन शहरातील मोठ्यात मोठा हॉल देखील कमी पडत आहे .कोरोनाच्या महामारीत चक्रीवादळात खंबीरपणे सामोरे गेलो ,जाती भेद दूर सारून अनेक संघटनांनी उत्तम कार्य केले ,या भागाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री म्हणून अदितीताई तसेच खासदार म्हणून साहेबानी झुकते माप दिले आहे .सुमारे 75 कोटी रुपयाची मदत या तालुक्याला आली .मित्र पक्षाला सोबत घेऊनच पक्षाला बळकटी द्यायची आहे .आपल्या पक्षाच्या नेत्यांचे विचार घराघरात पोहचवण्याचे काम करायचे आहे ,साहेबांच्या खासदार निधीतून व पालकमंत्री अदितीताईच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले .इथला भूमिपुत्र इथेच राहील अशी रोजगार व्यवस्था करावयाची आहे ,रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी स्थानिकांचे सहकार्य महत्वाचे आहे ,रासायनिक प्रकल्प व्यतिरिक्त दुसरा प्रकल्प आणावयाच्या झाल्यास त्याचे स्वागत करावे ,कार्यकर्त्याला मोठे करण्यासाठी कार्यकर्ता शिबीर आयोजित केल्याचे सांगितले .
यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आम .सुरेश लाड म्हणाले की ,जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन आढावा घेत पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न चालू आहे ,आपण सर्व नैसर्गिक संकटांशी सामना करतोय जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे काम खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी केले आहे .जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचे काम केले आहे .कोविड च्या काळात रुग्णांना हॉस्पिटल व बेड उपलब्ध करून देण्याचे काम देखील केले आहे .ज्यांच्या विरोधात आपण लढलो त्यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून विकास कामे सुरु आहेत .फडणवीस सरकारला सत्तेपासून वंचित ठेवण्याचे काम शरद पवार साहेबानी केले आहे .विरोधी पक्ष महाविकास आघाडीची सत्ता डळमळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे .गुजरात मध्ये नमस्ते ट्रॅम कार्यक्रम झाला नसता तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नसता ,वेळीच एअर पोर्ट सील केले असते तर या रोगाचा प्रादुर्भाव वाढला नसता .मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचे काम काही लोकांकडून केले जात आहे ,मंदिरे उघडली गेली तर गर्दी होईल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल रोग नियंत्रणात येणार नाही हे माहित असताना मंदिरे खुली करण्याचा अट्टहास धरून रोग वाढला कि या सरकार वर ठपका ठेवायचा आणि राष्ट्रपती राजवट लावायची असे गलिच्छ राजकारण चालू आहे ,राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला तर केंद्रात देखील असा प्रयोग करतील या भीतीने महाविकास आघाडीचे सरकार डळमळीत करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जात असल्याचे सांगितले ,
कार्यकर्ता मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, गीताताई पालरेचा ,जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे जिल्हा युवती अध्यक्ष सायली दळवी ,मधुकर पाटील ,विजय मोरे ,सुधाकर घारे ,बबन मनवे ,गीताताई जाधव ,उत्तम जाधव ,अशोक धोत्रे ,गणेश पवार ,महंमद मेमन ,नाझीम हसवारे ,प्रगती अडावडे ,श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, रायगड जिल्ह्यातील विविध भागांचे प्रमुख व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्ता शिबिराच्या आधी श्रीवर्धन नगरपालिकेत जिल्हा अध्यक्ष माजी आ.सुरेश लाड व आ.अनिकेत यांच्या समवेत खासदार सुनील तटकरे यांनी विविध विकास कामाचा शासकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला .कार्यकर्ता शिबीर आटोपल्यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी प्रवाशांच्या सेवेसाठी श्रीवर्धन आगारात स्लीपर कोच बस लोकार्पित केल्या .