ब्रेकिंग न्यूज
दोन वाहनांच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू
महाराष्ट्र मिरर टीम-पनवेल
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आपलं कर्तव्य बजवणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा दोन वाहनांच्या धडकेमध्ये सापडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दि. 13 ऑक्टोबर 2020 रोजी साधारणपणे 2.45 वाजताच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल सचिन सोनवलकर गस्त घालत होते. त्याच दरम्यान पुणे लेनवर किलोमीटर 12.400 पुणे लेनच्या दरम्यान MH 04 GF 4563 या ट्रकला मागून येणाऱ्या कंटेनर क्रमांक NL 01 L 6497 ने धडक दिली. त्या ठिकाणी अचानक उदभवलेल्या अपघातात स्वतः ला वाचविण्यासाठी प्रयत्न करणारे ट्रॅफिक पोलीस कर्मचारी सचिन सोनवलकर यांना अपयश आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या वृत्ताची खबर मिळताच महामार्ग वाहतूक विभागाचे ठाणे डिव्हिजनचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान आणि सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत