मल्लेवाडी येथे पती समोर पत्नी ओढ्याच्या पुरात वाहून गेली
उमेश पाटील -सांगली
मल्लेवाडी (ता. मिरज) येथे बुधवारी रात्री झालेल्या प्रचंड पावसाने गावाजवळील ओढ्याला आलेल्या पुरातून तीन जण वाहून गेलेल्या पैकी दोघांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले तर एक महिला वाहून गेल्याने मरण पावली. तर मल्लेवाडी येथील आठवड्याला आलेल्या पुरामुळे काल रात्री मिरजेतील एक युवक गाडीसह वाहून गेला तर गुरुवारी दुपारी पाच वाजता बेळंकी येथील एक गाडी वाहून गेले गाडीवरील दोघेही होऊन बाहेर आले पण गाड्या मात्र मिळाल्या नाहीत.
मिरज पूर्व भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्य महामार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आला होता यामध्ये मालगाव येथे पाहुण्याकडे गेलेले दरुरे कुटुंबीय रात्री मल्लेवाडी ऐथे येऊन मुक्काम केले .पण दर्ग्या जवळील मळ्यातील घराकडे जाण्यासाठी गडबड करत त्यानी मल्लेवाडीतील पूर आलेल्या ओढ्यातून आपल्या घरी जाण्यासाठी पाणी असूनही प्रयत्न केला. त्यावेळी सौ. जयश्री संजय दुरूरे (वय 40 ), पती संजय धनपाल दरुरे ( वय 48)व धोंडीराम लालासो शिंदे (वय 62) हे पूर आलेल्या पाण्यातून आपल्या घरी निघाले होते.
पण पाण्याचा प्रवाह वाढल्याने जयश्री ह्या पाण्याच्या प्रवाहात पडल्या तर त्यांचे पती व शिंदे यांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला .ओढापात्रात त्यांची वाचण्यासाठी चाललेली धडपड पाहून चौकातील तरुणानी तात्काळ धाव घेतली. प्रचंड आलेल्या पुरामध्ये सुद्धा तरुणाने उड्या टाकून दरूरे व शिंदे यांना वाचवण्यात यश मिळवले पण सौ.दरुरे ह्या पतीच्या डोळ्यादेखत पाण्यातून वाहून गेल्या पाण्याच्या प्रवाहात गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने गावात प्रचंड हळहळ व्यक्त होत होती. दोन तासानंतर त्यांचा मृतदेह सापडला.
तसेच मल्लेवाडी जवळील आडवड्यावर ही मोठ्या प्रमाणात पूर आला होता. बुधवारी रात्री मिरज येथील एक मोटरसायकलस्वार पुराच्या पाण्यात गाडी घातल्याने गाडीसह वाहून गेला .पण तो स्वतः पोहत पुन्हा रस्त्यावर आला त्यामुळे तो वाचला .तसेच गुरुवारी सायंकाळी पाच वाजता बेळंकी येथील एक व्यक्तीने पुराच्या पाण्यात मध्ये गाडी घातली तोही गाडीसह वाहून गेला पण तोही पोहुन बाहेर आला. सदर दोन्ही व्यक्तींच्या गाड्या पुरामध्ये अद्याप गायब आहेत .मिरज पूर्व भागामध्ये पडलेला प्रचंड पावसाने खंडेराजुरी ,एरंडोली, बेळंकी, बेडग परिसरामध्ये पूर आल्याने संपूर्ण पूर्व भागाचा मिरज शहराशी संपर्क तुटला आहे. द्राक्ष, ऊस, भाजीपाला या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.