सुनील गोगटे यांनी घेतली राज्यपालांची भेट माथेरान येथे इ रिक्षा आणि महाराष्ट्रात प्रत्येक गावातील गावठाण क्षेत्र वाढविण्यासाठी दिले निवेदन
Team Maharashtra Mirror10/06/2020 10:13:00 AM
0
सुनील गोगटे यांनी घेतली राज्यपालांची भेट
माथेरान येथे इ रिक्षा आणि महाराष्ट्रात प्रत्येक गावातील गावठाण क्षेत्र वाढविण्यासाठी दिले निवेदन
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
माथेरान येथे इ रिक्षा चालू करावी आणि महाराष्ट्रात प्रत्येक गावातील गावठाण क्षेत्र वाढवण्यात यावे यासंबंधीचे निवेदन आज कर्जतचे रहिवासी आणि किसान मोर्चाचे सुनील गोगटे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशायारी यांची राजभवन येथे भेट घेऊन दिले
माथेरान येथे सध्या दस्तुरी ते माथेरान ही वाहतूक घोड्यावर बसून अथवा सायकल रिक्षा जी माणूस ओढत नेतो। अश्या पद्धतीने होते .माणुस माणसाला घेऊन सायकल ओढतो हे अमानुष आहे. त्यासाठी माथेरान येथे इ रिक्षा चालू करावी ही स्थानिकांची मागणी गेली अनेक वर्षांपासून आहे. परंतु पर्यावरण आणि वन मंत्रालय त्यास परवानगी देत नाही .त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तेथे इ रिक्षा चालू करावी असा अध्यादेश काढावा आणि केंद्र सरकार कडे मागणी करावी अशी विनंती राज्यपाल यांना गोगटे यांनी केली त्याबत त्यांनी लवकरच कार्यवाही करू असे आश्वासन दिले तसेच गावोगावी लोकसंख्या वाढीमुळे घरे बांधण्यास जागा नाही त्यासाठी पूर्वी महाराष्ट्र शासनाने गावठाण क्षेत्रांत वाढ केली होती तशीच वाढ पुन्हा करावी असे सांगितले असता योग्य समस्या असून लवकरच त्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊ असे सांगितले.
याप्रसंगी भाजप किसान मोर्चचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा कोकण संपर्क प्रमुख सुनिल गोगटे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईर नगरसेवक पनवेल खारघरचे निलेश बाविस्कर माथेरानचे भाजप शहर अध्यक्ष विलास पाटील कर्जत तालुका व्यापारी आघाडी अध्यक्ष सुनील सोनी आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकुर उपस्थित होते.