Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

साताऱ्यात हाजी हाशम भाई तांबोळी यांच्या नावाने सुरू झालेले "राहत"हेल्थ केअर सेंटरचे कार्य कौतुकास्पद:ना.बाळासाहेब पाटील

 

 साताऱ्यात हाजी हाशम भाई तांबोळी यांच्या नावाने सुरू झालेले "राहत"हेल्थ केअर सेंटरचे कार्य कौतुकास्पद:ना.बाळासाहेब पाटील

प्रतिक मिसाळ- सातारा



साताऱ्यात हाजी हाशमभाई तांबोळी यांच्या नावाने सुरू झालेल्या हाजी हाशमभाई तांबोळी वेल्फेअर फाउंडेशनच्या राहत हेल्थ केअर सेंटरच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील कोविडग्रस्ताना राहत देण्यासाठी कोविड सेंटरचा उदघाटन सोहळा शुक्रवारी संध्याकाळी 5:30 वाजता संपन्न झाला . सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाशी दोन हात करण्यासाठी दानशूर कै . हाजी हाशमभाई तांबोळी यांचे चिरंजीव हाजी अस्लमभाई तांबोळी व हाजी इब्राहीमभाई ( बाबाशेठ तांबोळी ) यांनी प्रशासनाला साथ देत राहत कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद तर आहेच सर्व सोयीनियुक्त स्वखर्चाने केलेल्या अत्याधुनिक हॉस्पिलटचे योगदान हे मोलाचे आहे असा विश्वास सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हाजी हाशमभाई तांबोळी वेलफेअर संचलित राहत हेल्थ केअर सेंटरच्या उदघाटन प्रसंगी काढले.

कोविडला घाबरायचे काहीही कारण नाही परंतु योग्य वेळी उपचार सुरू केल्यास आपण 100 % कोरोनावर मात करू शकतो असा विश्वास देत सुरुवातीला सर्व चाचण्या करून कोविडवरिल उपचार सुरु करावेत लक्षणे लपवू नका , अशी सूचना देखील सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा जिल्हावासीयांना दिली . सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथील जम्बो कोविड सेंटरच्या उदघाटनानंतर संध्याकाळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते , गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई , साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये व सोशल डिस्टनसिंग चे पालन करत मोजक्याच मान्यवराच्या उपस्थितीत हाजी हाशमभाई तांबोळी वेलफेअर फाउंडेशनच्या राहत हेल्थ केअर सेंटरचा उदघाटन सोहळा संपन्न झाला . कै हाजी हाशमभाई तांबोळी हे संपूर्ण महाराष्ट्रात एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत आणि त्याचा अनुभव मला देखील आहे कारण माझे त्यांच्या कुटुंबाशी जवळचे नाते आहे.हाजीसाहेबांच्या समाजकार्याचे व्रत असेच पुढे चालू ठेवत अस्लमशेठ तांबोळी व बाबाशेठ तांबोळी यांनी सुरू ठेवलेलं कार्य हे कौतुकास्पद आहे , असे मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले व सेंटरला शुभेच्छा दिल्या . अल्पावधीत निर्णय घेत सुरू केलेल्या कोविड सेंटरच्या सर्व कार्याला आमच्या पहिल्यापासून शुभेच्छा असून काहीही आवश्यकता वाटल्यास आम्ही सर्वोतोपरी सहकार्य करू असा विश्वास साताऱ्याचे  आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला . सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट कोविड सेंटर म्हणून गणना करावी अश्या सुविधा , अत्याधुनिक तंत्रज्ञान राहत कोविड सेंटरचया माध्यमातून हाजी हाशमभाई तांबोळी वेलफेअर फाउंडेशनने उपलब्ध करून दिल्या आहेत .एवढी प्रशस्तता , अत्याधुनिकता किंचितच कोठे अनुभवयास मिळेल अशा शब्दात साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हाजी हाशमभाई तांबोळी वेलफेअर फाउंडेशन च्या राहत कोविड केअर सेंटरचे कौतुक करत सर्व व्यवस्थापकीय मंडळाचे कौतुक केले . रुग्णांच्यासाठी उत्कृष्ट दर्जाच्या भोजनाची , समुपदेशनाची , व्हिडिओ कॉलिंगची , आपुलकीची सेवा देण्याची त्याच बरोबर फलाहार आणि रुग्ण अल्पावधीत कोरोनामुक्त होण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या सर्व सोयी सुविधांचे काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याची पूर्ण तयारी अस्लमभाई तांबोळी , बाबाभाई तांबोळी राहत सेंटरच्या व्यवस्थापकीय समिती व अजिंक्यतारा हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय समितीने केली असल्याची स्पष्टोक्ती प्रस्तावनेत सादिकभाई शेख यांनी केली . उदघाटन प्रसंगी तब्लिग जमातीचे अमीर सहाब अनिसभाई तांबोळी , जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण , प्रांताधिकारी मिनाज मुल्ला , माजी सरकारी वकील दिलावर मुल्ला , रफिक बागवान , शाकिर बागवान , शफीक शेख , झाकीर मि झंवर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies