नवरात्रोत्सव नियोजन बैठकीत असा प्रकार घडलाच नाही षडयंत्र रचणाऱ्याचा लवकरच समाचार घेणार : आ.भास्कर जाधव
तुरंबव गावातील ग्रामस्थ माझ्या सोबत त्यांनी एडिड केलेला व्हिडीओ फिरवला नाही
आ.जाधव यांचा विरोधकांवर जबरदस्त पलटवार
ओंकार रेळेकर-चिपळूण
तुरंबव गावी शारदादेवी मंदिरात कमिटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मंडळी यांची मंगळवारी सायंकाळी नवरात्रोसव नियोजन संदर्भात बैठक सुरू असतांना झालेली वादावादी मी सोडविण्यास गेलो असतांना सुमारे शंभर-दीडशे ग्रामस्थांना शांत करीत असतांना एखादा शब्द निघाला असेल पण या बैठकीत मारहाणीचा प्रकार घडलाच नाही मी कोणालाही मारहाण केलेली नाही सावर्डे येथील माझे राजकीय हितचिंतक चोखपणे रोजंमदारी पार पाडत आहेत यातून त्यांना लखलाभ होवो तुरंबव गावातील ग्रामस्थ मंडळी माझ्या सोबत आहेत त्यांनी एडिट केलेला व्हिडीओ फिरवला नाही असे स्पष्ट करून षडयंत्र रचणाऱ्याचा लवकरच यथोचित सन्मान करून समाचार घेतला जाईल असा जबरदस्त पलटवार महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे,आ.जाधव यांच्या संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते,शारदादेवी मंदिराच्या वतीने नवरात्रोत्सव साजरा करतांना शासनाला सहकार्य करूया शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सामंजस्याने ,एकोप्याने
पारंपारीक पद्धतीने उत्सव साजरा करूया असे मी सांगत असतांना अजित पालशेतकर यांना सुभाष पंडित यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत मारले,हे वाद सोडविण्याचा मी प्रयत्न केला परंतु परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे वाटल्याने कडक भूमिका घ्यावी लागली,पण मी येथे कोणालाही मारहाण केली नाही,गावातील ग्रामस्थ मंडळींनी नव्हे तर माझ्यावर अतिउत्साही प्रेम असलेल्या मोजक्याच हितचिंतकांनी एडिट करून ही क्लिप सर्वत्र पाठविली,गावात एकी नांदावी उत्सव शांततेत पार पडावा या करिता या बैठकीत मी पदाधिकारी ,ग्रामस्थ मंडळींना संमजविण्याचा प्रयत्न केला परंतु पूर्व नियोजित कट असल्यासारखे विरोधक माझ्या बदनामीचे षडयंत्र रचतील अशी मला कल्पनाही आली नव्हती असे आ.जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले,
शारदादेवीचा नवरात्रौत्सव जगभर प्रसिद्ध आहे. नवरात्रौत्सवात अनेक भाविक येथे नवस फेडण्यासाठी येतात. आम्हीही येथे मंदिराबाहेर भक्तीभावाने बसलेलो असतो. यावर्षी कोरोना महामारीमुळे मंदिरे बंदच आहेत. अशावेळी उत्सव साजरा करतांनादेवीची रुपं लावणे व ओटी नवसभरण्यावरुन काही वाद झाला पालशेतकर यांची मागणी कमिटी सदस्यांनी नामंजूर केली,अध्यक्ष दिगंबर पंडित यांनी अजित पालशेतकर व श्रीधर पालशेतकर यांना जातीवाचक शिवी दिली तर मंदिराच्या ट्रस्टीशी संबंधित नसलेले त्यांचे भाऊ सुभाष पंडित, नारायण पंडित, कृष्णा पंडित यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत त्याना मारले व त्यांना ओढत मंदिराबाहेर काढले जात होते. यावेळी मंदिराच्या बाहेर शंभर ते दीडशे ग्रामस्थ उपस्थित होते. अजित पालशेतकर यांनी सावर्डे
पोलिसांना फोन केला. मलाही निनावी फोन आला. तुम्ही
ताबडतोब या, नाही तर आपला देव कोर्टात जाईल. अनायसे मी
गावातच फॅक्टरीत होतो. मीही पोलिसांना फोन करून सांगितले.
मी गेलो तेवढ्यात पोलीसही तेथे आले. मी पोलिसांना सांगितले
की, मी आलो नसतो तर अनर्थ ओढवला असता, मी यांना
समजावले आहे, तुम्ही त्यांना(ट्रस्टी)समजावून सांगा व उत्सव एकत्रित कोरोनाची काळजी घेऊच साजरा होऊ द्या. यावेळी आमच्यासमोर सुभाष पंडित यानी पुन्हा त्यांना मारहाण व जातीवाचक शिव्या दिल्या. मी दोघांनाही बडबडलो व वाद मिटवा असे सांगितले. काहींनी याची क्लिप केली. आपण गावची इज्जत वेशीवर टांगायची का?यावरूनही मी सांगितले. अखेर कोणीही तक्रार न करता हा वाद देवी शारदेच्या समोरच संपला होता. आता दोन दिवसांनी मिटलेल्या वादाची क्लिप जाणीवपूर्वक पसरवून खळबळ
उडवली जात आहे. ही क्लिप मोडून तोडून माझ्या गावच्या बाहेरच्या लोकांनी तयार करून सर्वत्र फिरवली. माझे राजकीय हितचिंतक खूप आहेत ते माझ्यावरील प्रेमापोटी असे उद्योग अधूनमधून करीत असतात. गणपतीपुळे येथील कार्यक्रमात खासदार विनायक राऊत
यांचा मी हात झटकला ही क्लिप अशाच माझ्या हितचिंतकांनी केली होती. त्याप्रमाणेच माझ्या अशा हितचिंतकांनी याही विषयात चोख काम केले.हे सावर्डे ते रत्नागिरी कनेक्शन आहे. अर्थात याचा न्याय शारदादेवीच करेल आमची तिच्यावर पूर्ण श्रद्धा आहे. मात्र हे काम माझ्या गावातील कोणाही व्यक्तीने केलेले नाही असे आ. जाधव यांनी आवर्जून सांगितले.