नवरात्री मध्ये स्वच्छता कर्मचारी व गरजवंत महिलांची भरली ओटी.
मिलिंद लोहार-पुणे
यावेळी या हडपसरवासीयांनी एक आगळीवेगळी संकल्पना मांडली. या नवरात्रीमध्ये आपली चांगली साडी धुवून व इस्त्री करून दिली म्हणजे ती साडी खऱ्या गरजवंता पर्यंत पोहचवता येईल असे आवाहन फेसबुक व व्हाट्सअपद्वारे आवाहन केले. या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आणि 400 पेक्षा जास्त साड्या जमा झाल्या आहेत व होत आहेत..
मग या साड्या खऱ्या गरजवंतांना म्हणजे जोगवा मागणाऱ्या महिलांना, कचरा डेपो मधील महिलांना, आश्रम मधील महिलांना, स्वच्छतेचे काम करणाऱ्या कचरावेचक महिलांना अशा विविध महिला ज्यांनी करूना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता स्वच्छतेचे काम केले. ज्या वेळेस आपण घरात बसून होतो त्या वेळेस या महिला आपला परिसर स्वच्छ करत होते. यावेळी अशा महिलांचा सन्मान केला ज्यांना एकच साडी नाईलाजास्तव 2-4 दिवस घालावी लागते.
अशा विविध प्रकारच्या महिलांचा साडी देऊन त्यांचा सन्मान करून त्यांची एका अर्थाने पूजा केली.
अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना योगेश गोंधळे, दिलीप मोरे यांची होती.. या कार्यक्रमामध्ये डॉ. शंतनू जगदाळे, चौधरी,रुपाली वांबुरे, मनीषा राऊत, डॉ. अश्विनी शेंडे, स्मिताताई गायकवाड, संगीता बोराटे यांचे सहकार्य लाभले..