एमएमआरडीए आयुक्तांकडून माथेरान मधील कामांची पाहणी
चंद्रकांत सुतार --माथेरान
एमएमआरडीएच्या माध्यमातून माथेरान मध्ये अनेक विकास कामे युद्धपातळीवर सुरू असून एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांसह अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ गोविंद राज यांनी दि.१२ रोजी माथेरान मध्ये प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन या कामांची पाहणी केली.
यावेळी एमएमआरडीए चे कार्यकारी अभियंता अरविंद धाबे, नगराध्यक्षा प्रेरणा सावंत,माथेरान नगरपरिषद गटनेते प्रसाद सावंत,ठेकेदार नितीन लढाणी तसेच या कामावर विशेष देखरेख असणारे जुझरभाई आदी उपस्थित होते.
माथेरान मधील महत्वाच्या पॅनोरमा पॉईंट वर उत्तम प्रकारे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी
अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कामे पूर्ण करावीत यामध्ये पर्यटकांना बसण्यासाठी जांभ्या दगडात आकर्षक असे अद्ययावत बाकडे त्याचप्रमाणे बाजूला उद्यान आणि त्या जागी पूर्वी असणाऱ्या आणि बारमुख पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारंजाचे सुशोभीकरणासाठी जलदगतीने प्रयत्न करावेत असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी सूचित केले. तर ही कामे पूर्ण करण्यासाठी ट्रॅक्टरची नितांत आवश्यकता आहे कारण हातगाडीवर मालाची वाहतूक करणे म्हणजे कामाला खूपच वेळ खर्ची होऊ शकतो यासाठी प्रयत्न केला जाईल आगामी काळात इथे ई रिक्षा सुरू झाल्यास इथल्या घोडेवाल्याना सुध्दा पर्यायी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे.पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी फिनिक्युलर रेल्वे सुरू होण्यासाठी काम चालू आहे त्यामुळे इथल्या पर्यटन व्यवसायाला नक्कीच चालना मिळणार आहे असेही राजीव यांनी सांगितले.