सामाजिक कार्यकर्ते किशोर वेदपाठक यांनी आदिवासी मुलांना दिली पुस्तकांची अनोखी भेट ,वाचन उपक्रमास चालना !
महाराष्ट्र मिरर टीम-माणगावशाळा बंद असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासात गुंतून जावेत त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने सामाजिक कार्यकर्ते किशोर वेदपाठक यांनी आदिवासी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गोष्टीरूप पुस्तकांचा संच भेट दिला आहे .
करोणा महामारी च्या काळात शाळा बंद असल्याने अनेक विद्यार्थी अभ्यास व वाचन प्रक्रिये पासून दूर आहेत .विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी व त्यांचे अभ्यासातील स्वारस्य कायम राहावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर वेदपाठक यांनी आपल्या मातोश्री निलप्रभा नरेंद्र वेदपाठक यांच्या स्मरणार्थ गोष्टीरूप पुस्तकांच्या 30 पुस्तकांचा संच ग्रामीण व अदिवासी भागातील विद्यार्थ्यांना भेट दिला आहे. तालुक्यातील निळज,वावे दिवाळी ,रिळे या शाळातील,गावांतील विद्यार्थ्यांना सदर पुस्तके भेट देण्यात आली आहेत.
(छाया-संतोष सुतार)
विद्यार्थी वाचन प्रक्रियेत रमून जावीत त्यांना वाचनाची आवड निर्माण यासाठी पुस्तके भेट दिली असल्याचे श्री किशोर वेदपाठक यांनी सांगितले आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना मिळालेली ही मदत मारुती फौंडेशनचे अध्यक्ष अजित शेडगे यांनी ही मदत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे. वाचन संस्कृती लोप पावत असताना विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी पुस्तकांचे संच विद्यार्थ्यांना उपयुक्त असून सर्व विध्यार्थी पालकांनी आनंद व्यक्त करून सामाजिक कार्यकर्ते किशोर वेदपाठक व मारुती फाउंडेशनचे आभार व्यक्त केले आहेत . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तके दिल्याबद्दल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक केले जात आहे .