जमिनीच्या वादात पोलिसांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी कृष्ण प्रकाश आयुक्त यांचा नवीन फतवा
मिलिंद लोहार-पुणे
पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या जमिनीच्या व्यवहारात आणि त्यातील आर्थिक गणितामध्ये पोलिसांना अनावश्यक रस असल्याचे निदर्शनास आले आहे याच पार्श्वभूमीवर जमिनीच्या वादात पोलिसांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी फतवा काढला आहे या फतव्यानुसार पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक जमिनीच्या व्यवहारात थेट लक्ष घालू शकत नाहीत
गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड बऱ्याच भागांमध्ये जमीन एकाच्या नावावर त्याच्यावर मालकीहक्क दुसरा दाखवतोय असे बरेच प्रकार घडू लागले आहेत मात्र यात सर्वसामान्य लोकांचे हाल होतात दादागिरी करून घर खाली करणे असे प्रकार पुणे शहरात घडू लागले तसेच काही सोसायटीमधील अरेरावी करणारे सोसायटी मेंबर सेक्रेटरी खजिनदार चेअरमन हेही त्यात सामील होत होते त्याच प्रकारे चिरीमिरी पोलिसांना देऊन फ्लॅटधारकांना धमकावणे भाडेकरूंना धमकावणे घरातून बाहेर काढणे असेच बरेच प्रकार पुण्यामध्ये होत आहेत त्याच प्रकारे जमीन धारक नोंदणी असतानादेखील काही अपप्रवृत्ती चे लोक वयस्कर माणसांना जबरदस्तीने घर खाली करायला लावतात मात्र या सर्व गोष्टींमध्ये काही अधिकारी तसेच चिरीमिरी घेणारे लोक असतात यांना आळा घालण्यासाठी आयुक्त कृष्णप्रकाश यांनी चांगला सपाटा चालू केला आहे आयुक्त कृष्णप्रकाश बहुतेक करून लवकरच पुणे पिंपरी चिंचवड गावगुंडांची घाण साफ करणार असे दिसत आहे
गेल्या काही दिवसापासून आयुक्त कृष्णप्रकाश आल्यापासून शहरांमध्ये अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी धडक कारवाईची मोहीम सुरू आहे पुणे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वेगवेगळ्या अवैध धंद्यांना उधाण आले असता ना कृष्णप्रकाश यांनी केलेल्या रोजच्या धडाकेबाज कारवाईमुळे पुणेकरांना पुण्यामध्ये कोणतरी नवीन सिंघम आल्यासारखे वाटत आहे तरी शहरातील सर्व नागरिक अशा गोष्टींमुळे हैराण झाले होते अगोदरच पुण्यातील जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत मात्र काही लोकांच्या दहशतीमुळे पुण्यात काही ठिकाणी राहणे ही मुश्किल झालेले आहे मात्र काही ठिकाणी पोलिसांना जमीन व्यवहारात हस्तक्षेप करता येत नाही तरीही ही काही निवडक अधिकारी माया साठवण्यासाठी आपल्या परिवाराची काळजी न करताही हस्तक्षेप करतात व याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होतो हे कुठेतरी थांबायला पाहिजे असे नागरिकांकडून बोलले जात असतानाच कृष्णप्रकाश यांनी काढलेल्या फतव्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे