पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर यांच्याकडून विरोधक चारही मुंड्या चित
प्रतीक मिसाळ -पाचगणी
स्वच्छता अभियानात देशात अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी ताई कराडकर यांनी गेल्या 20 वर्षात अविरतपणे कार्य करत व सर्वांना बरोबर घेऊन पाचगणी चे नाव देशातच नव्हे तर जगाच्या नकाशावर अत्यंत चांगल्या पद्धतीने आणले आहे लक्ष्मी ताई कराडकर यांची काम करण्याची पद्धत ही सर्वसामान्य लोकांना भावली असून काही विरोधकांनी लक्ष्मीताई कराडकर यांच्यावर केलेल्या कुरघोडी केल्या स्वत : लक्ष्मीताई कराडकर यांनी रोखठोक व लोकशाही पद्धतीचे उत्तर दिले असून आगामी काळात पाचगणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्या नक्कीच कटिबद्ध राहतील, जगातील दोन नंबरंचे पठार व स्वच्छतेचे रोल मॉडेल म्हणुन नावलौकीक असलेल्या पाचगणी नगरपालीकेत गत काही दिवसांपूर्वी उपनगराध्यक्ष निवडीत.नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर यांनी संयमी राजकारण करत . उपनगराध्यक्ष विनोद बिरामणे यांची निवड करताना त्यांना समसमान मतदान झाले .समसमान मतदान झाल्यामुळे कास्टिगं मताचा वापर करत विनोद बिरामणे यांच्यापाठीशी नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर यांनी निर्णायक मतदान केले . पाचगणी नगरपालिकेत गतकाही दिवसापासुन नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर यांना शह देण्याकरीता.सुनियोजीत कटकारस्थान सुरु असताना.विरोधकानमधुनच चार नगरसेवकांना आपल्या गटात आणत नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर यांनी पुन्हा पाचगणी नगरपालीकेवर मजबूत पकड मिळवली आहे . नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर यांना विरोध करण्याकरीता नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर याच्यावर मनमानी कारभाराचा ठपका ठेवत .अविश्वास ठराव देखील दाखल केला होता .यावेळी १३ नगरसेवकांनी एकमुठ करत अविश्वास ठराव दाखल करुन नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर यांची कोंडी केली होती .मात्र नगराध्यक्षा कराडकर यांनी अविश्वास ठरावाच्या तुफानात देखील,आपली राजकीय नौका डगमगु दिली नाही . नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर यांना राज्य शासनाच्या नगर विकास खात्याच्या अप्पर सचिव यांनी क्लीन चीट देताच . लक्ष्मीताई कराडकर यांनी पुन्हा पाचगणीत विरोधकांना चेकमेट देत अविश्वास ठराव फेटाळून लावला .
पाचगणीत राजकीय उलथापालथीच्या धक्कातत्र सुरु असताना पाचगणी नगरपालीकेच्या नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर मात्र, आपला गेलेला गट बांधण्यात पुन्हा यशस्वी झाले असल्याचे चित्र पाहायला मिळाले .पाचगणीत उपनगराध्यक्षाच्या निवडीत समसमान मते मिळवण्याचा धक्का विरोधकांना जबरदस्त टोला होता . पाचगणीत राजकीय सारीपाठावर सर्व काही हातातुन गेल असल्याच चित्र दिसत असताना.पाचगणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर यांची पुन्हा मुसंडी,राजकीय गणिताची समिकरण बदलत केलेली गोळाबेरीज,भविष्यात विरोधकांना लक्ष्मी कराडकर यांना चेकमेट देण्याकरीता फार संघर्ष करावा लागणार हे मात्र नक्की . एकीकडे राजकीय कुरघोडी करण्याचा विरोधकांच्या डाव सुरु असताना . राजकीय मैदानातून युद्ध सुरु असताना शहराच्या विकासाचा आलेख सदैव चढता ठेवण्यात देखील . नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर यांनी शहराच्या विकासात बहुमोल सरकार्य ठेवत . पाचगणी शहराचा स्वच्छतेच्या सप्तपदीत . नावलौकीक कायम ठेवला असल्याचे लपुन राहीले नाही .