पंचायत समिती आटपाडीत दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन कक्षाची स्थापना
महाराष्ट्र मिरर टीम-आटपाडी
सव्यांग व्यक्ती त्यांच्या जीवनातील अडचणींवर मार्ग काढण्यासाठी सक्षम असते, परंतू विकलांग, बहुविकलांगांचे काय.? निसर्गाने विकलांग बनविले असले तरी सरकारची जबाबदारी असते. त्यांचं जिवन सुखकर व्हावे, यासाठी ज्या काही गोष्टींची गरज आहे त्या उपलब्ध करून देणे,त्याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. सर्व प्रकारच्या दिव्यांगांना योग्य शिक्षण मिळावे, त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवावे,तसेच दिव्यांगांना फक्त ते दिव्यांग आहेत म्हणून डावलणे, अपमान करणे,योग्य मान सम्मान न देणे, त्यांना दमदाटी करणे यांवर आळा घालणे गरजेचे आहे.
यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनांनी शासनाने स्वतंत्र दिव्यांगांना सल्ला व मार्गदर्शन करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली होती.
याची दखल घेत व दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ च्या नुसार मा. आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय महा. राज्य पुणे यांनी दि. २३/०८/२०२० रोजी दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन कक्षाच्या स्थापणेबाबत सर्व जि. प. ना आदेश दिले.
दिव्यांगासाठी राज्य सरकारबरोबर केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना अस्तित्वात आहेत त्याबाबत दिव्यांगांना माहीती करून देण्याचं, त्यांच्या हक्कांबाबत त्यांना माहीती देण्याचं काम निवास पाटील गेल्या चार पाच वर्षांपासून निस्वार्थीपणे करत आहेत.
त्यांच्या पाठपुराव्यामुळे व बी. डी. ओ. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२८/१०/२०२० रोजी पं. स. आटपाडी येथे दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन कक्षाची स्थापना करण्यात आली.
या कक्षांतर्गत दिव्यांगांना स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार यांच्या योजनांची व अपंग वित्त विकास महामंडळ योजनांची माहीती दिली जाणार आहे. त्यांच बरोबर दिव्यांगत्वाचे प्रकार त्यांची ओळखपत्रे,त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून दिव्यांग संरक्षण कायदा २०१६ व त्यांच्या कलमांची माहीती दिव्यांगांना देवून त्यांचे संरक्षण केले जाईल. मूल जन्मास आल्यावर लगेच ते सव्यंग की दिव्यांग आहे यांचे निदान करून उपाययोजना करण्यासाठी त्यांचे शिघ्र निदान व उपाययोजना केल्या जातील. त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे. पिडीत दिव्यांगास समुपदेशन करणे, हक्कांविषयी जनजागृती करणे, तज्ञ वकील, डॅाक्टर यांचे मार्गदर्शन ऊपलब्ध करून देणे अश्याप्रकारची कामे या कक्षामार्फत केली जाणार आहेत. तरी याचा दिव्यांगांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन कक्ष स्थापना कार्यक्रमावेळी पंचायत समिती आटपाडीच्या सभापती भूमिका बेरगळ ,गटविकास अधिकारी भोसले , कक्षाधिकारी मंडले ,दिव्यांग सामाजिक सामाजिक कार्यकर्ते निवास पाटील तसेच समग्र शिक्षा अभियान चे ऐवळे, हेगडे विटा अजित राव सूर्यवंशी विशेष निवासी विद्यालय विटा शाळेचे मुख्याध्यापक लोखंडे उपस्थित होते.
यावेळी सभापती बेरगळ यांनी दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शक्य ती मदत करण्याची भावना व्यक्त केली.