उंब्रज मध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस उंब्रज अंधारवाडी रस्ता पाण्याखाली
कुलदीप मोहिते -कराड
गेल्या दोन दिवस परतीच्या पावसाने थोडीशी विश्रांती घेतली होती पण
सोमवारी दुपारी अचानक वातावरण ढगाळ झाले वातावरणात प्रचंड प्रमाणात उकाडा निर्माण झाला होता दुपारी दोनच्या सुमारास कराड उत्तर मध्ये पावसाने विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली या मुसळधार पावसामुळे कराड तालुक्यातील उंब्रज येथे मुसळधार पावसामुळे उंब्रज अंधारवाडी रस्ता हा काही काळा पाण्याखाली गेला होता उंब्रज अंधार वाडी रोड नजीक असलेल्या ओढ्या चे पाणी रोडवर आल्यामुळे पूर्ण रस्ता हा पाण्याखाली गेला तसेच पाणी शेतात शिरल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली उंब्रज अंधार वाडी रोडवरील वाहतूक ही काही काळ बंद करण्यात आली होती त्यामुळे उंब्रज अंधार वाडी रोडवर ये-जा करणाऱ्या नागरिकांची ही गैरसोय झाली होती