राज्य सरकार "गझनी" झाल्याची माजी कृषिमंत्री अनिल बोंडेंची कर्जतमध्ये सडकून टीका!
नरेश कोळंबे-कर्जत
कृषी विधेयकाचा खोटा अपप्रचार राज्य सरकार करत असून विरोध करणाऱ्याना धारेवर धरत राज्यसरकार गझनी असल्याची टीका माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी कर्जत येथे केली.यावेळी संदिपकुमार चांदोरकर किसान मोर्चाचे उपाध्यक्ष, सुधीर दिवे किसान मोर्चाचे सरचिटणीस, अशोक गायकर सचिव, मंगेश म्हसकर तालुकाध्यक्ष, सुनील गोगटे संपर्कप्रमुख, अशोक ओसवाल उपनगराध्यक्ष, विशाखा जीनगरे नगरसेविका, परशुराम म्हसे जिल्हाध्यक्ष आदी भाजप कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.
कर्जत येथे माजी कृषिमंत्री व किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनिल बोंडे यांनी भेट देत विविध योजना तसेच कृषी विधेयक ह्या विषयी माहिती दिली.
यावेळी बोलताना त्यांनी राज्यसरकार हे अपप्रचार करत असून कृषी विधेयक हे व्यापारी धार्जिणे नसून शेतकऱ्यांसाठी असल्याचे सांगितले. अगोदर शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकटीमध्ये राहूनच आपले धान्ये व वस्तू विकावे लागत होते आता ते निर्बंध उठल्याने शेतकरी कुठेही कर न भरता आपले धान्ये, कडधान्ये, डाळी व इतर तृणधान्य कुठेही विकता येणार आहे. तसेच नवीन करारानुसार शेतकरी योग्य भावाने कुठल्याही व्यापाऱ्याला माल विक्री करू शकणार आहे. जो भाव आहे त्यानुसार व्यापाऱ्याला भाव देणे कराराने बंधनकारक राहणार आहे.तसेच साठवणुकीची बंदी उठविण्यासाठी कांदे, बटाटे, तृणधान्ये, तेलबिया आदी वस्तूंना जीवनावश्यक वस्तूंच्या यादी मधुन वगळण्यात आले आहे. ह्या सगळ्या गोष्टी 2019 मध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यात होत्या व शरद पवारांच्या आत्मचरित्रात बाजार समिती जोखड तोडावे, असे स्पष्ट नमूद असल्याचे अनिल बोंडे यांनी सांगितले. त्यामुळे आधी बोललेले आता विसरले असून त्यांचा " गझनी झाला " असल्याची टीका त्यांनी यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षावर केली.
यावेळेस विरोधासाठी विरोध न करण्याचे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले व त्यामुळेच आम्ही शिवार चर्चा कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना या कृषी विधेयकाची माहिती देणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
यावेळी संदिपकुमार चांदोरकर किसान मोर्चाचे उपाध्यक्ष, सुधीर दिवे किसान मोर्चाचे सरचिटणीस, मंगेश म्हसकर तालुकाध्यक्ष, सुनील गोगटे संपर्कप्रमुख, अशोक ओसवाल उपनगराध्यक्ष, विशाखा जीनगरे नगरसेविका, परशुराम म्हसे जिल्हाध्यक्ष, अशोक गायकर सचिव,ऋषीकेश जोशी आदी भाजप कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.