राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धेचा निकाल जाहीर.
महाराष्ट्र मिरर टीम-तुळजापूर
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये या महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेला वाव मिळावा याकरिता राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान गटातून प्रथम क्रमांक. सिद्धी घाडगे, द्वितीय क्रमांक. शर्वरी फणसे, तृतीय क्रमांक. आर्या मोरे तर मोठ्या गटात प्रथम चैतन्य काजुळकर , द्वितीय सोहम भंडलकर,तृतीय समृद्धी खांडेकर, कस्तुरी खांडेकर
या सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा. अभिनेत्री. अश्विनी महांगडे आणि उपाध्यक्ष निलेश जगदाळे यांनी कौतुक केले.
तर ही स्पर्धा यशस्वी ठरण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य मुंबई विभाग जितेंद्र तेलवणे, शीतलताई बारी, विदर्भ मराठवाडा विभाग ज्ञानेश्वर काळे, कृष्णा पाटील, कोकण विभाग डॉ.बोंडे, डॉ.काटकर, उत्तर महाराष्ट्र अभिजित जाधव तर पश्चिम महाराष्ट्र विभाग आकाश जाधव आणि महेश मोरे यांचे कार्य खूप मोलाचे ठरले याकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रतिष्ठानचे प्रवक्ते प्रमोद कारकर यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांचे पारितोषिक हे घरपोच मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.