राज्याचे सहकार व पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पावसाने झालेल्या नुकसानी बाबत आढावा बैठक संपन्न
Team Maharashtra Mirror10/15/2020 10:04:00 AM
0
राज्याचे सहकार व पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पावसाने झालेल्या नुकसानी बाबत आढावा बैठक संपन्न
मुंबईवरून येत असतानाच पालकमंत्र्यांनी बोलवली जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची आढावा बैठक
कुलदिप मोहिते- कराड
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने इतर राज्यांसह महाराष्ट्रात देखील दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, कोरेगाव, फलटण, पाटण, माण, खटाव, वाई, महाबळेश्वर, जावळी, खंडाळा तालुक्यातील देखील जवळपास सर्वच भागात गेल्या दोन- तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतातील असणारी सोयाबीन, भात, ज्वारी व अन्य पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाच्या झालेल्या नुकसानीबाबत व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्ते, छोटे-मोठे पूल व पडझड झालेल्या घरांच्या नुकसानीबाबत राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी ४.०० वा.जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे जिल्हाधिकारी दालनात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व जिल्ह्यातील इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.