Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

No title

 

लाळ खुरकत रोगाच्या समुळ उच्चाटनासाठी गायवर्ग व म्हैसवर्ग जनावरांना टॅगिंगसह लसीकरण करावे - जिल्हाधिकारी शेखर सिंह


प्रतिक मिसाळ -सातारा



  लाळ खुरकत रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पशुपालकांनी त्यांच्याकडील सर्व ( गायवर्ग व म्हैसवर्ग ) नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधून टॅगिंगसह लसीकरण करुन घ्यावे , असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले . येथील पशुसंवर्धन विभागात लाळ खुरकरत लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले . यावेळी ते बोलत होते . या कार्यक्रमास जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ . अंकुश परिहार जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ . संजय शिंदे , पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ . मिलिंद मोरे , सहायक पशुधन विकास अधिकारी श्री शिंदे आदी उपस्थित होते . पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम या महत्वकांक्षी योजनेंतर्गत पशुधनातील लाळ खुरकत रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहेत . तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी लसीकरण कार्यक्रमाचा लाभ घेऊन लाळ खुरकत रोगाचे समुळ उच्चाटन करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे .



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies