Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

माथेरान मिनिट्रेन लवकरच सुरू करण्यासाठी रेल्वेच्या सचिवांना नगराध्यक्षाचे निवेदन

 माथेरान मिनिट्रेन लवकरच सुरू करण्यासाठी रेल्वेच्या सचिवांना नगराध्यक्षांचे निवेदन


चंद्रकांत सुतार ---माथेरान


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच पर्यंटनस्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती त्यामुळे जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या माथेरानच्या मिनिट्रेनची सेवा सुध्दा पर्यटकांअभावी बंद होती.दरवर्षी चार महिने पावसाळ्यात मिनिट्रेन सेवा बंद असते परंतु अमन लॉज ते माथेरान स्टेशन दरम्यान शटल सेवा उपलब्ध होती ती सुद्धा सध्या बंद आहे. माथेरान पर्यटनस्थळ २ सप्टेंबर पासुन अनलॉक करण्यात आले आहे त्यामुळे इथे पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. दस्तुरी पासून तीन किलोमीटर गावात येण्यासाठी त्याना खूपच त्रासदायक बनलेले असते त्यामुळे शटल सेवा उपलब्ध व्हावी यासाठी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी तसेच मावळ मतदार संघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेचे मुख्य सचिव शलभ गोएल यांना निवेदन सादर करून ही सेवा सुरू करावी अशी विनंती केली आहे यावेळी माजी नगराध्यक्ष अजय सावंत,विवेक चौधरी यांसह नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत हे सचिवांच्या दालनात उपस्थित होते.

आज गुरूवार दि २५ ऑक्टोबर रोजी अमनलॉज ते माथेरान  मिनी ट्रेन शटल सेवा लॉक डाऊन नन्तर पुर्ववत सुरू करण्यासाठी आणि माथेरानच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी माथेरानच्या नगराध्यक्षा  प्रेरणा प्रसाद सावंत, माजी नगराध्यक्ष मा श्री अजयजी सावंत* यांनी मध्य रेल्वे चे सचिव मा श्री शलभ गोएल* यांची मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली त्यावेळी श्री गोएल यांनी कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर  ट्रेन सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी मा मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे परवानगी पत्राची आवश्यकता आहे असे सांगितले, तद्नंतर मा मुख्य सचिव यांना *मावळ खासदार मा श्री अप्पासाहेब बारणे यांचे शिफारस पत्र आणि मा नगराध्यक्षा* माथेरान यांचे मागणी पत्र देण्यात आले... त्याच वेळी मंत्रालयात खासदार तथा रायगडचे माजी पालकमंत्री सुनीलजी तटकरे साहेबांनी मा मुख्य सचिव श्री संजय कुमार साहेब यांची मा नगराध्यक्षा आणि माजी नगराध्यक्ष यांच्यासोबत मा मुख्य सचिव यांचे दालनात समक्ष भेट घेतली आणि शटल सेवा तात्काळ सुरू होणे अत्यावश्यक आहे ते पटवून दिले...मा मुख्य सचिव यांनी सकारात्मक भूमिका घेत तात्काळ आपत्ती आणि पुनर्वसन सचिवालयाला माथेरान मिनी ट्रेन शटल सेवा पुन्हा सुरू करणेसाठी रेल्वे प्रशासनाच्या मागणी नुसार प्रस्ताव तयार करण्याचे आणि महाराष्ट्र शासनातर्फे रेल्वे प्रशासनाला पत्र देण्यास सांगितले आहे येत्या काही दिवसातच याची पूर्तता करून पहिल्या टप्प्यात अमनलॉज ते माथेरान ही शटल सेवा सुरू करण्यात येईल त्यामुळे माथेरानच्या पर्यटनाला चालना मिळण्यास मदत मिळणार आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies