"माझे कुटुंब माझी जबाबदारी" या विषयावर जनजागृती.
सुधीर पाटील सांगली
माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावर क्षत्रिय लोकसंपर्क ब्युरो पुणे सांगली गीत आणि नाटक विभाग पुणे अंतर्गत प्रसारण मंत्रालय निमणी येथे जनजागृती करण्यात आली.
(भारत सरकार ) शाहिरी लोककला संस्कृती विकास केंद्र मिरजवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली यांचा माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावर निमणी येथे प्रबोधन व जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला .
या कार्यक्रमांमध्ये सोशल डिस्टंसिंग चे पालन कसे करावे ,वारंवार साबनाने हाथ धुवावेत ,कोणताही त्रास जाणवत असेल तरी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा गरज असल्यास घराबाहेर पडावे .अन्यथा घरी थांबून कोरोना ची साखळी तोडण्यासाठी मदत करावी कोरोना सारख्या महामारीने जगास वेठीस धरले आहे .आपल्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी सर्वांनीच शासनाने सांगितलेल्या नियमाचे पालन करावे व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे देशामध्ये अनेक युद्धे झाली ती रणांगणावरती मात्र हे युद्ध आपल्याला घरी थांबून जिंकायचा आहे व राज्यांमध्ये आणि देशांमध्ये कोरोना ची साखळी तोडण्याचा प्रयत्न करायचा आहे .
कोणीही खोटी माहिती प्रशासनाला देऊ नये कोरोना कशा पद्धतीने आटोक्यात आणता येईल या संदर्भातील सर्व माहिती या जनजागृती कार्यक्रमांतर्गत देण्यात आली . सादर करते शाहीर अनिता खरात, संजय येवले , सुरेश खरात ,कोरस गायकवाड, लिलाचंद खरात तसेच या कार्यक्रमासाठी निमणी गावचे सरपंच विजय पाटील उपसरपंच दिनकर पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य नामदेव जमदाडे प्रहार जनशक्ती पक्षाचे तासगाव तालुका अध्यक्ष पाटील ,आर डी पाटील आदी मंडळी उपस्थित होते .