उंबऱ्या गणपती मित्र मंडळ आणि शेवंता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने सिंहगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार चंद्रकांत मोरे यांचा सन्मान
मिलिंद लोहार- पुणे
लॉकडाऊन काळात चंद्रकांत मोरे यांनी धायरी भागातील जनसामान्यांना मोलाचे सहकार्य लाभले तसेच त्यांच्या कार्याने धायरी परिसरातील नागरिकांना वेळेत सेवा मिळत होत्या या कार्याची दखल घेऊन धायरी ग्रामस्थांनी विशेष दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी दत्ता पोकळे ,तुकाराम चव्हाण ,पद्माकर लायगुडे ,सुरेश पिलाने, गडाप्पा गुरव ,ज्ञानेश्वर पोकळे ,कुणाल पोकळे आदी उपस्थित होते सिंहगड पोलीस ठाणे यांचे सहाय्यक फौजदार चंद्रकांत मोरे यांना कोरूना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात करण्यात आला. धायरी येथील उमरगा गणपती मित्र मंडळ आणि शेवटचा सहकारी गृह रचना संस्था यांच्यावतीने हा सन्मान करण्यात आला .सन्मानामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे