निसर्गाचे वरदहस्त लाभलेलले नयनरम्य माथेरान
चंद्रकांत सुतार--माथेरान
समुद्र सपाटी पासून 803 मीटर उंचीवर असलेले नैसर्गिक कलाविष्काराने सजलेले लहानसे गाव ,सहयाद्रीच्या पर्वत रांगेत डोंगर माथ्यावर थंड हवेच्या निसर्गाच्या सानिध्यात एकांतात वसलेले गाव म्हणजेच माथेरान
माथेरानचा शोध
1850 साली ठाण्याचे जिल्हाधिकारी ह्यूज मेलेट यांनी लावला, या थंड हवेच्या ठिकाणी काही मोठं मोठ्या धनिकांनी जागा विकत घेऊन बंगले व हॉटेल उभारली.माथेरान मधील सर्वाधिक पहिला बंगला द बाईक हा आताचा बाईक हॉटेल आज ही तो बंगला सुरक्षित जतन आहे माथेरान हा 1670 एकरचा भूभाग म्हणजे ५२ किलोमीटर परिसर आहे. या परिसरा मध्ये एकूण 150 ते 200 बंगले आहेत
आताच्या तुलनेत माथेरानची लोकसंख्या एकूण 5500 आहे.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या माथेरान चे प्रमुख आकर्षण म्हणजे मिनी ट्रेन,डोंगर दर्या, अनेक नागमोडी वळने सर करत 2 तासात माथेरानमध्ये मोठ्या दिमाखात असंख्य पर्यटकाना घेऊन दाखल होत असते. ईवल्याश्या छोट्या गाडीत बसून प्रवास करण्याची मज्जा काही वेगळीच आहे, म्हणूनच देश विदेशातील पर्यटक नेहमीच माथेरान मध्ये निसर्गाच्या सानिध्यात थंड हवेच्या ठिकाणी मजा मस्ती करण्यासाठी येत असतात.
मुबई - पुणे आदी ठिकाणापासून जवळचे असल्याने पर्यटनासाठी प्रेमी युगलांची तर इथे मांदियाळीच असते, त्यामुळे येथील हॉटेल लॉजिग घोडे सवारी आदींचे धंदे जोमात असतात. तसेच येथील उद्योग धंदे पर्यटकांन वर अवलंबून असतात माथेरान मध्ये घोडे सवारी आणि हात रिक्षा हेच प्रमुख वाहन असल्याने घोडा किंवा हात रिक्षेतून प्रवास करताना पर्यटकांना सुद्धा तितकाच आनंद होतो जणू काही स्वप्नातल्या दुनियेतून वावरत असतात
माथेरान पाहण्यासाठी तब्बल 38 पॉईंट आहेत त्यापैकी महत्वाचे एकूण 12 पॉइंट्स आहेत यात पाच पॉईंट सर्कल मध्ये शारलोट लेक, लॉर्ड पॉईंट सिलिया एक्को , हनिमून लुईझा यापैकी तर सात पॉईंट सर्कल मध्ये, अलेक्झांडर ,रामबाग, चौक , लिटिल चौक वन ट्री हिल , बेळवेदर हे पॉईंट येत असतात, बारा पॉईंट सर्कल मध्ये ह्याच पॉईंट चा समावेश होऊन दुसरे छोटे पॉईंट त्यात समाविस्त केले जातात, सर्वात उंचीवर असलेला पॉईंट म्हणजेच पॅनोरमा पॉईंट
पॅनोरमा व गारबट पॉईंट वरून सकाळी सूर्योदय पाहता येतो तर संध्याकाळी सनसेट पॉईंट पार्क्यु पाईन पॉईंट वरून पाहता येतो. माथेरान गावा मध्ये वाहन बंदी असल्याने येथे सर्वत्र लाल मातीचेच रस्ते पाहावयास मिळतात, माथेरान फिरताना लाल मातीच्या रस्त्यावरून चालण्याची मजा काही वेगळीच असते कितीही चालले तरी थकवा जाणवत नाही, येथे फिरताना मधेच माकड लीला पहावयास मिळतात, खास करून महिला पर्यटकांनच्या हातातील खाद्य पदार्थ हमखास पळवून नेताना पाहवयास मिळते,त्यामुळे घाबरून च का होईना एक वेगळा आनंद अनुभव ही पर्यटकांच्या हास्यतून जाणवतो, सर्वत्र गारवा कायमस्वरूपी जाणवत असतो, मनाला ताजेतवाने करणारा निसर्ग,अलौकिक सौंदर्य नीटसे पाहवायचे असेल तर किमान 2 दिवस तरी इथे मुक्काम केल्याशिवाय इथल्या निसर्गाची अनुभूती होत नाही, येथील प्रसिद्ध चिक्की , चामड्याच्या वस्तू, माकड घोडा हात रिक्षा लाल माती अजून खूप काही या निसर्गाने भरभरुन नैसर्गिक ठेवा दिलेला आहे, येथील घनदाट जंगलात अनेक वन्यजीव आहेत तसेच आढळून देखील येतात भेकर, मुंगूस, कालिंदर, ससा, डुक्कर, शेकरू, रानमांजर, घोरपड तसेच सर्प धामण, घोणस, चापडया हरणटोळ,मण्यार, अजगर , व पक्षी बुलबुल, कूटरुक, गोगी, घुबड, घार, पारवे, रगीबेरीगी छोटं चिमण्या,, तसेच अनेक प्रकारची फुल पाखरे सुद्धा येथे पहावयास मिळतात.येथे मध ही मुबलक प्रमाणात मिळते त्या मुळेच माथेरान रायगड जिल्ह्यातील एकमेव नैसर्गिक थंड हवेचे ठिकाण वरदान ठरलेले, आहे, नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात थंडीचे प्रमान 12 अंश पर्यंत खाली येते ह्या थंडीचा आनंद घेण्यासाठी वर्ष अखेरीस पर्यटक येथे येत असतात, शनिवार रविवार म्हंटला की पर्यटकांची जत्राच बघावयास मिळते एकदा माथेरान पाहिल्यावर पुन्हां पुन्हा इकडे येण्यासाठी चाहूल लागते पाऊले वळतात
सध्या लॉकडाऊन शिथिल केल्याने हळूहळू पर्यटक माथेरानला यायला सुरुवात झाली आहे.येथील व्यावसायिक घोडे, हात रिक्षा, दुकानदार हॉटेल,लॉजिग सर्वच माथेरानकर येणाऱ्या दिवाळी सिझनकडे चातकासारखी वाट पाहत आहेत, सध्या निसर्गरम्यता पाहायची असेल तर नक्कीच माथेरानला यायलाच पाहिजे!