वारणे वस्ती कुरळोशी ते कुरोशी रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले
ग्रामस्थांनी दिले खासदार श्रीनिवास पाटील यांना निवेदन
कुलदीप मोहिते-कराड
जावळी तालुक्यातील राजमार्ग वारणे वस्ती कुरळोशी ते कुरोशी रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. या संदर्भात सदर रस्ता तीन किलोमीटर अंतर आहे सदर रस्ता वनविभागाच्या वन हद्दीतून 730 मीटर लांब सहा मीटर रुंद एवढा जात आहे त्यास वनविभागाने मंजुरी द्यावी. ही मागणी करणारे लेखी निवेदन नुकतेच कुरळोशी व गाढवली पुनर्वसन येथील ग्रामस्थांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना कऱ्हाड येथे त्यांच्या कार्यालयात दिले.
निवेदनातील माहिती अशी की, केळघर-कुरळोशी-कुरोशी रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास अतिशय दुर्गम असलेल्या तापोळा (कोयना) विभागातील 84 गावे केळघर ,मेढा बाजारपेठेला जोडली जाऊ शकतात .तापोळा ते केळघर अंतर पन्नास किलोमीटर,होऊ शकते सदर रस्ता झालीस भविष्यातील दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल.व स्थानिक पर्यटन व स्थानिकांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील .त्यामुळे वनखात्याशी संपर्क करून या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊ असे आश्वासन ग्रामस्थांशी बोलताना दिले.
यावेळी कुरळोशी चे सरपंच रमेश वाडकर,गाढवली चे सरपंच बबन शिंदे, उपसरपंच निलेश तोडकर, जावळी तालुका राष्ट्रवादी पदवीधरसंघाचे अध्यक्ष संकेत पाटील, प्रशांत पाटील, संदीप तोडकर ,विशाल जंगम, जी डी माने, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कऱ्हाड:श्रीनिवास पाटील यांना निवेदन देताना बबन शिंदे, रमेश वाडकर, संकेत पाटील, प्रशांत पाटील आदी.