खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक किशोर पानसरे यांनी सुरू ठेवली विकासकामांची शृंखला
प्रभाग क्रमांक 3 मधल्या शौचालय इमारतीचे लोकार्पण संपन्न
महाराष्ट्र मिरर टीम-खोपोली
खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुुुुमन औसरमल यांच्या हस्ते करण्यात आले हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.एका मागोमाग एक अशा विविध विकास कामांच्या यादीत या शौचालय इमारतीची भर पडली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यशैलीचे सर्वच स्तरांवर कौतुक केले जात आहे तर तेथील स्थानिक नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या प्रकाश नगर येथील शौचालय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आवर्जून आलेल्या मुख्याधिकारी गणेश शेटे, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे औटी,आरोग्य सभापती वैशाली जाधव,ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, नगरसेविका सुनिता गायकवाड,माधवी रिठे, जिनी सँम्युअल, नगरसेवक दिलीप जाधव, सामाजिक कार्यकर्ते रमेश मोगरे, प्रविण क्षिरसागर, बीआरएसपी तालुकाध्यक्ष अमित पवार यांचे नगरसेवक किशोर पानसरे यांनी स्वागत केले.
सार्वजनिक शौचालयाचा वापर योग्य पद्धतीने करावा आणि स्वच्छता पाळावी असे नागरिकांना आवाहन करताना जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल यानी किशोर पानसरे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
सरफराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विकासकामांचे भूमिपूजन व हा लोकार्पण सोहळा आयोजित केल्याचे किशोर पानसरे यांनी प्रतिपादन केले. प्रभाग क्रमांक 3 हा आदर्शवत स्वरुपात असावा यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत असा विश्वासही या वेळी त्यांनी व्यक्त केला.