कोरोना योद्धा कोरोना पुढे हरला.
आरोग्य सेवक रविंद्र राठोड यांचे निधन
दिनेश हरपुडे-
महाराष्ट्र मिरर टीम -कर्जत
रायगड जिल्हा परिषद आरोग्य सेवेत प्राथमिक उपकेंद्र कशेळे येथे कार्यरत असलेले आरोग्य सेवक रविंद्र राठोड यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले.राठोड यांनी कशेळे परिसरात काही दिवसांपूर्वी कोरोनाचा पादुर्भाव मोठ्या वाढला होता यावेळी राठोड यांनी गावातील लोकांची कुटूंबातील सदस्य प्रमाणे काळजी घेऊन घरोघरी जाऊन औषध दिले होते.त्यामुळे कशेळे गाव कोरोना मुक्त करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.त्यांना देखील कोरोना लागण झाली होती ते रायगड हॉस्पिटल येथे अनेक दिवसापासून उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले.कोरोना योद्धा काम करत असताना कोरोनाला मात्र हरवू शकले नाहीत.
कर्जत तालुक्यातील कशेळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आंबिवली यांच्या अंतर्गत कशेळे येथे प्राथमिक उपकेंद्र आहे येथे रविंद राठोड हे अनेक वर्षांपासून आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते.राठोड हे आरोग्य सेवा अतिशय चांगल्या प्रकारे देत असल्याने ग्रामस्थांशी त्यांचे जिव्हाळाचे संबंध होते.ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कशेळे परिसरात कोरोनाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव वाढला होता.यावेळी राठोड यांनी जबाबदारी ओळखून गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना औषधे तसेच धीर देऊन घरातील एखाद्या कुटूंबातील सदस्य प्रमाणे काळजी घेत होते त्यामुळे कशेळे मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश देखील आले आणि कशेळेतील कोरोना बधितांची संख्या शून्यावर आणली.कशेळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात राठोड यांनी मोलाचे काम केले होते.परंतु रुग्णांची सेवा करत असताना त्यांना देखील कोरोनाची लागण झाली ते कर्जत मधील रायगड हॉस्पिटल येथे अनेक दिवस उपचार घेत होते परंतु हा कोरोना योद्धा कोरोना पुढे हरला असेच म्हणावे लागेल.