सातारा नवनिर्वाचित जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा स्थानिक गुन्हे शाखेची बेकायदा शस्त्रप्रकरणी मोठी कारवाई
कुलदीप मोहिते/ हेमंत पाटील -कराड
कराड तालुक्यामधील तासवडे औद्योगिक वसाहतीत दोन बेकायदा रिव्हॉल्व्हर व तीन जिवंत काडतुसासह वावरणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन १ लाख १ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तासवडे औद्योगिक वसाहतीतील एका रेसॉर्टमध्ये एक इसम दोन रिव्हॉल्व्हरसह येणार असल्याची गोपनीय माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती . त्यानंतर त्यांनी या इसमास ताब्यात घेण्याच्या सूचना पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड व पथकाला दिल्या.
त्यानुसार या पथकाने रेसॉर्टसमोर सापळा लावला होता. त्यावेळी हॉटेलच्या बेसमेंटमधील डायनिंग हॉलमधून संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता १ लाख १ हजार रूपये किमतीची दोन बेकायदा रिव्हॉल्व्हर व तीन जिवंत काडतुसे मिळून आली.
संशयिताला पुढील कार्यवाहीकामी तळबीड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनांप्रमाणे सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस हवालदार सुधीर बनकर, संजय शिर्के, अतिश घाडगे, विजय कांबळे, पोलीस नाईक शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार, रोहित निकम, मोहसिन मोमीन यांनी या कारवाईत भाग घेतला.