धक्कादायक: पुण्यात तेरा दिवसांच्या बाळाला आई वडिलांनीच पुरले
पुण्यातील सिंहगड रोड भागातला धक्कादायक प्रकार
मिलिंद लोहार -पुणे
तेरा दिवसांच्या बाळाला त्याच्या आई वडिलांनीच पुरुन टाकल्याचा प्रकार पुण्यातल्या सिंहगड रोड भागात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड रोडवरील वडगाव परीसरातल्या झाडांमध्ये या बाळाला पुरण्यात आलं. सिंहगड कॉलेजच्या मागच्या बाजूस असलेल्या दाट झाडांच्या परिसरात पाहणी केली असता तिथे एका खड्ड्यात बाळाला पुरण्यात आलं आहे. ते खोदण्या करिता प्रशासकीय परवानगी घ्यावी लागते. त्यानंतरच खड्डा खोदता येणार असल्याने अधिकारी परवानगीसाठी गेल्याचे सांगण्यात आले असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे सिंहगड पोलिसाकडून सांगण्यात आले आहे